एक पाऊल मागे : एका दाम्पत्याच्या पाटीलकीचा 'ताप'

मुंबई - डॉक्टर गुडगुडकरांच्या एक पाऊल मागे चॅनेलची ही कहाणी. रिपोर्टर पत्नी आणि शिफ्ट इन्चार्ज पती असल्यामुळे अख्ख्या चॅनेलला 'पाटील'की सहन करावी लागतेय. पत्नीचा वॉक थ्रू, पॅकेज झाला नाही तर पती लीचमधल्या टीमला शिव्या घालतो. कोणी उशीर केला, कळत नाही का, या शब्दात उद्धार केला जातो. एके काळी हाच पती लीचमध्ये व्हिज्युअल, बाईट कापायचा. मात्र आता नियतीचा 'विनोद' बघा तो असा. एकमेकांचे पत्ते कापत पती महाशयांनी प्रगती केली. या पती महाशयांना दिल्लीला रिपोर्टर व्हायचं होतं. मात्र तिथं 'रश्मी'ची निवड झाली. त्यामुळे तिच्या विरोधात सगळेच उभे राहिले. काळू मामा इनपूट हेड असूनही काड्या करण्यात मागे नव्हते. मात्र पती देवांचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. दाम्पत्यापैकी एक संपादकाला माघारी शिव्या घालतो तर दुसरा संपादकाबरोबर असतो. एकदा ग्रुपवरती एकाने सरांसाठीचा मेसेज चुकून टाकल्यानं मोठा गोंधळ झाला होता. खरी कमाल तर तेव्हा झाली जेव्हा या दाम्पत्याला पहाटे संपादकाच्या घराच्या खाली एका ड्रायव्हरने पाहिले होते. मात्र नंतर त्या ड्रायव्हरलाच कामावरून काढण्यात आले. आता यांचा जाच थांबायचा तरी कधी ?