नगर अपडेट

महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या नगर आवृत्तीत सध्या सावळा गोंधळ सुरु आहे. सिनिअर रिर्पोटर व उपसंपादक मंडळी जुनेच विषय (पेनड्राईव्ह) आकडेमोड करून पुन्हा छापत असतानाच आता उपसंपादकांच्या डुलक्याही चव्हाट्यावर आल्या आहेत. हॅलो अहमदनगरचे पान एक पाहणार्‍या सिनिअर उपसंपादकाची डुलकी आज चांगलीच चर्चेचा विषय ठरली. ‘शनिशिंगणापूर येथे चार लाख भाविकांनी साईदर्शन घेतले असे कॅप्शनच या उपसंपादकाने डुलकीच्याभरात छापून टाकले. शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन होते तर शिर्डीत साईदर्शन होते हेही या सिनिअरला कळू नये?
.....
मी मराठी लाईव्ह पुण्यात येत असल्याचे पाहून नगरमध्ये अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
....
बेरक्याने वर्तविल्याप्रमाणे दैनिक सार्वमतचे कार्यालय प्रिटिंग युनीट असलेल्या एमआयडीसीत स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे नेवाशावरून अप-डाउन करणार्‍या एका मुख्यउपसंपादकासह शहरातील रिपोर्टर व उपसंपादकांचे हेलपाटे व आर्थिक खर्च वाढले असले तरी सारडाशेठचे दरमहा ६० हजार रुपये मात्र वाचले आहेत.