'पद्मश्रीं'च्या पेपरात निर्णय 'डॉक्टर पद्मश्री'च्या मर्जीने!! महिला पत्रकारावर अन्याय!!!

सध्या 'पद्मश्रीं'च्या पेपराचे काही खरे राहिलेले नाही. नाशकात 'बुवाबाजी'ने पार वाट लावलीय; त्यामुळे जळगाव, धुळे-नंदुरबार हे खान्देशचे एकस्पान्स्शन रखडलेय. सहा महिन्यात ही  मंडळी अजून मालेगाव विभागीय कार्यालय सुरू करू शकलेली नाही. मुंबईतही 'रंगीलो रे म्हारो'च्या लीला सुरूच आहेत. परवा दुपारी हे हिरो सकाळची कार्यालयातील प्लानिंग मीटिंग सोडून  परळच्या फोनिक्स मिलमधील पंचतारांकित अशा खास मालवणी "गझाली' हॉटेलमध्ये पोहोचले. एका राजदूतावासातील "देखण्या" मैत्रिणीसोबत त्यांचा खाना ठरला होता. ती पूर्वाश्रमाचीच  "मानबिंदू"तून 'मान खाली घालून बाहेर पडायला लावणारी' "देखणी" बाई व्याकुळतेने वाट पाहत बसलेली! काही माणसे सुधरतच नाही मुळी. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही  म्हणावे की कामातुराणां न भयं न लज्जा??
 
बाईच्या प्रेमळ शिफारसीवरून म्हणे आता "रंगीला" आपल्या रंगरुपाचा 'मेकओव्हर' करतोय; आधीच बोकड्यासारखी फ्रेंच कट दाढी ठेवलीय. टकलावर एक केस सापडेल तर शप्पथ; पण  बोकड्केस मात्र वाढलेहेत! "गझाली"मध्ये 'रंगीला'ने एन्ट्री मारली झोकात; ठरलेल्या जागी बसलेल्या "ती'च्या वर एक "देखणा" कटाक्ष टाकला; बोकडागत प्रेमाने केस कुरवाळले, स्वत:चेच!  एका क्षणाकरता "ती'च्या थोडी पुढे 'रंगीला'ची नजर ओझरती फिरली अन त्याने "ती"ला ओळखले न ओळखले करीत ढुंगणाला पाय लावून पळ काढला. "ती'च्या दोन हातांवरील टेबलवर  होता कोण तो पत्रकार?? फार उत्सुकता असेल तर 'रंगीला'लाच विचारा कारण 'बेरक्या' काही त्या पत्रकाराला ओळखत नाही. त्या पत्रकारालाही काही कळतंय की नाही, कोण जाणे! इतक्या  सुंदर अशा देखण्या अन रंगील्या लंचच्या कार्यक्रमाचा विचका केला. दोन जीवांचा तळतळाट लागेल त्याला! तरीही एक प्रश्न राहतोच; की मराठी दैनिकात काम करणारा माणूस "गझाली'त  प्रेयसीवर उधळायला पैसा आणतो कुठून? कारण लाखभर पगार असला तरी हे नवाबी शौक मराठी दैनिकात काम करणाऱ्याला परवडणारे नाहीत. काय भानगड आहे ते त्या "काशीनाथ  कुलकर्णी"लाच विचारायला हवे! असो. सुरुवातीलाच हे असे विषयांतर झाले तर 'पद्मश्री' राहायचे बाजूला आणि पोस्टला निव्वळ 'रंगीला'च कैफ चढत जाईल.
 
या 'रंगीला'मुळे मुंबईत माणसेच येत नाहीत आणि आलीच तर टिकत नाहीत. अशात आता पद्मश्री काहीही करायला लागलेले आहेत. त्यांचे 98 कुळी शहाणपण, तोरा, न्यायबुद्धी सारे काही  लोकांच्या हातातील बाहुले झालेय. आता तर चक्क एका मुजोर, मस्तवाल,  'पद्मश्री' असूनही 'लहान'च राहिलेल्या डॉक्टरच्या मर्जीनुसार पेपराचे निर्णय व्हायला लागले आहेत. हा डॉक्टर  कितीही आव आणत असला तरी काही तेव्हढा वंदनीय नाही. सर्व संपादक-पत्रकारांना त्याने अगदी व्यवस्थित 'सेटिंग' करून ठेवलेय इतकेच! स्वत:च्या केबिनच्या रिनोव्हेशनवर अकारण  या पद्मश्री डॉक्टरने लाखो रुपये उधळलेहेत; एका मेट्रनला छळ-छळ छळलेय!! मागासवर्गीयांचा जातीवाचक उल्लेख करतो, कर्मचाऱ्यांना हिडीस-फिडीस करतो. गेल्यावर्षीच्या सुरुवातीला   फेब्रुवारीत या डॉक्टरच्या विरोधात संप पुकारला गेला होता. ते प्रकरण चांगले गाजलेही!! 'पद्मश्रीं'च्या दैनिकातील एका "नीती'मान लेडी रिपोर्टरने बेधडक-बिनधास्त पत्रकारिता करून  'डॉक्टर पद्मश्री'ला फार नागवे केले. 'महानगर'मधून शिकलेल्या पत्रकारितेचे संस्कार वाया जात नाही. इतर पत्रकारांप्रमाणे या पोरीने आपले इमान गहाण टाकले नाही; 'लहान' असलेल्या  डॉक्टरच्या तथाकथित मोठेपणाच्या वलयाला ती भुलली नाही. तो 'लहान' डॉक्टर तिला काही आमिष दाखवून थांबवू किंवा विकतही घेवू शकला नाही! ('बेरक्या' या मुलीच्या  प्रामाणिकपणा, धाडस आणि पेशाशी इमानाचे जाहीर कौतुक करतोय!! सलाम!!!) तेव्हा या डॉक्टरचा पार तिळपापड झाला.
 
मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयातील पत्रकार आपल्या दावणीला  आहेत आणि ही पोरगी ऐकत नाही म्हटल्यावर 'पद्मश्री लहान' डॉक्टरने हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला. या मुलीचे नोकरी घालवायचीच, या विचाराने डॉक्टर पेटला. हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी  व संघटना "नीती'मान पत्रकार मुलीच्या पाठी उभ्या राहिल्या. भायखळ्यात, दक्षिण मुंबईत कुस्तीच्या फडातला पेपर प्रथमच तुफान चालला... हातोहात विकला गेला... जागोजागी 'लहान  डॉक्टर'चा बुरखा फाडणाऱ्या बातमीच्या कात्रणाचे होर्डिंग्ज, फलक लागले! 7 वर्षे एकाच जागी तळ मांडून असलेल्या या नागोबा (की तात्याबा!) अशा 'लहान' डॉक्टरविरोधात आंदोलनाला  जोर मिळाला. त्यामुळे आणखीच पेटलेल्या पद्मश्री डॉक्टरने पेपरमालक पद्मश्रींना रंगवून स्टोरी सांगितली. त्या मुलीला काढा, असा हट्ट धरला. गेल्यावर्षी फेब्रुवारीत पेपरमालक पद्मश्रींची  न्यायबुद्धी शाबूत होती. त्यांनी अनेक वर्षे त्यांची चाटूगिरी करणाऱ्या, एका स्त्रीलंपट, ढेरपोट्या, 'राज'कीय पत्रकाराला हॉस्पिटलात पाठविले. त्याने खातरजमा करून मुलीची डेअरिंग व  बातम्याही पूर्ण सत्य तसेच खास असल्याची खात्री करवून घेतली. आयला हे आपल्याला कसे जमत नाही, असा विचार त्याला तेव्हा चमकून गेला असेल. अर्थात सारे आयुष्य दलाली  आणि सेटलमेंट यात घालविलेले चाटू ती हिंमत करू शकणार नाहीत. अशी दमाची आणि सत्याची पत्रकारिता करायला 'पाहिजेत जातीचेच'! ते काही 'नारायण नागबली'च्या नावे  ब्रह्मगिरीवर लोकांची धार्मिक लुबाडणूक करण्याइतके सोपे काम नाही. ज्या 'ढेरपोट्या'ना आणि दिसेल त्या मालकाचे 'कदम' चाटत राहणाऱ्यांनी यापुढे आणखी आपली अख्खी हयात  पत्रकारितेत घालविली तरी त्यांची हिंमत नाही व्हायची बेधडक-बिनधास्त पत्रकारितेची! या डेअरिंगबाज आणि "नीती'मान लेडी रिपोर्टरने उलट 'ढेरपोट्या'चे सेटलमेंटचे 'कदम'च उद्ध्वस्त  केले. ज्या दोन सीनिअर हरामखोरांनी एका चांगल्या ज्युनिअर रिपोर्टरची बदनामी केली त्यांनीच दोघांनी आणखी एकासह मिळून 'मिटवामिटवी'पोटी पद्मश्री लहान डॉक्टरकडून अडीच  लाखांचे शेण खाल्ल्याची आतल्या गोटातली पक्की खबर आहे. अर्थात हे सारे मूळ प्रकरण वर्षभरापूर्वीचे...
 
या सर्व प्रकरणाला वर्षानंतर पुन्हा फोडणी दिली गेली. कारण एक हरामखोर, लंपट 'कदमां'चा बुटक्या सारखा या बिचाऱ्या ज्युनिअर रिपोर्टरला छळत होता. रात्री-अपरात्री तो तिला  अश्लील एसएमएस पाठवायचा, विनाकारण कॉल करायचा. ती पोरगी बधली नाही म्हणूनच मग यांनी तिची बदनामी सुरू केली. सुरुवातीला चारित्र्याची अन नंतर यांनीच खाल्लेल्या  शेणाची! जसा लंपट 'कदमां'चा बुटक्या तसाच 'ढेरपोट्या'ही... अडीच लाख आणि इज्जतही गमावून बसलेला लहान डॉक्टर या मुलीला घालवायचेच म्हणून तरफडतच होता. वर्षभरानंतरही  जेव्हा पेपरवाले पद्मश्री त्याच्याकडे डोळे तपासायला गेले तेव्हा त्याचं जुनं दुखणं उफाळून आलं. त्या मुलीला काढाच, अशी अटच टाकली डॉक्टरने! रंगवून स्टोरीज पकविल्या. झाले! डोळे  तपासून पद्मश्री कार्यालयात आले. ती "नीती'मान लेडी रिपोर्टर, पद्मश्री मालक आणि मालकांचा अनेक वर्षांचा दलाल 'ढेरपोट्या' चमचा हे तिघेच, अशी बैठक झाली! कशासाठी तर  वर्षभरापूर्वी दिलेल्या बातमीच्या सत्यशोधनासाठी! खरेतर तेव्हाच 'ढेरपोट्या'ने हॉस्पिटलला भेट देवून सत्य जाणले होते. मात्र, मालकासमोर हा लाळघोटा कुत्रा नुसतीच जीभ हलवीत बसला.  एका शब्दानेही काही बोलला नाही! मालकाने तर जणू आपली न्यायबुद्धीच शाबूत ठेवली होती.
 
कुणीतरी एखादा 'लहान डॉक्टर' सांगतो म्हणून आपल्या पेपरचा कर्मचारी काढायचा, त्याला  उद्यापासून तू कामावर येवू नकोस, डॉक्टरची तू इथे काम करावेस ही इच्छा नसल्याचे सांगावे म्हणजे महाभयंकर आहे!! कुठे गेला यांचा छत्रपती बाणा? कुठे गेली न्यायबुद्धी? तो एखादा  लहान डॉक्टर आता तुमच्या पेपरचे निर्णय घेणार का? कुणाला काढायचे, कुणाला ठेवायचे हे बाहेरची व्यक्ती ठरविणार? मग मालक म्हणजे काय बाहुलं आहे बिनबुडाचं? 98 कुळांचा  अभिमान मिरविणाऱ्या, न्यायप्रिय छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणाऱ्याकडून ही असली अपेक्षा मुलीच नाही. मुंबईत माणसे का मिळत नाही तो काही फक्त एखाद्या 'रंगीला'चा दोष  नाही. पद्मश्री मालकांची धरसोड, असे काहीबाही ऐकून काहीबाही निर्णय घेणे आणि आपल्याच कर्मचाऱ्यांवर अन्याय करणे, हेही मुंबई खड्ड्यात जाण्याचे एक महत्त्वाचे अकारण आहे.  तुमच्या संस्थेत तुम्ही काय करायचे हे ठरविणारा तो लहान डॉक्टर कोण? उद्या तुम्ही त्याला त्याच्या हॉस्पिटलातल्या कुणाला असे तडकाफडकी काढायचे सांगितले तर तो ऐकेल का  तुमचे? कुणाचे काय आणि किती ऐकावे, याचे निदान काहीतरी तर तारतम्य हवे! आपलाच एव्हढा मजबूत पेपर असा 'मुकी बिचारी, कुणीही हाका' करून टाकलाय!
 
निदान त्या 'रंगीला'चे काही गुण तरी आहेत. जे काही मुंबईत तुमचे अस्तित्व आणि वेगळेपण टिकवून ठेवलेय ते त्यानेच; त्याच्याच धडपडीने!! तो एकटा खेचतोय! लंपट 'कदमां'चा  बुटक्या आणि 'ढेरपोट्या' दलाल यांची काय लायकी तरी काय आहे? मुली दिसल्या की लाळ टपकावतात!! नजरेने बलात्कार करतात साले!! तो 'रंगीला' निदान जे काही 'देखणे' धंदे  करायचे ते खुलेपणाने तरी करतो. या "नीती'मान लेडी रिपोर्टरच्या प्रकारणाबाबत 'बेरक्या' परिवार 'रंगीला'चे जाहीर अभिनंदन आणि कौतुक करायला संकोच करणार नाही. एका गरीब  घरच्या, बाप गमावल्या मुलीची नोकरी वाचावी म्हणून त्याने स्वत: त्या लहान डॉक्टरची समजूत काढली. गेल्यावर्षी या मुलीनेही त्याचे वाढदिवसाला बुके वैगेरे देवून शुभेच्छा देत साऱ्या  एपिसोडवर पडदा टाकला होता. एखाद्या घरातल्या कमावत्या व्यक्तीच्या पोटावर तुम्ही लाथ मारता तेव्हा भयानक पाप करत असता. संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणता. दलालीच्या  कमाईवर पोसलेल्या आणि टमटमित ढेरी फुगविलेल्यांना मेहनतीच्या पैशांचे महत्त्व काय उमगणार? नोकरी टिकावी म्हणून कोणी किती वेळा कोपऱ्यात जावून पद्मश्री मालकांचे पाय  धरले आणि कशा त्यांच्या लगेजची हमाली केली, 'सामान' ने-आण केले... हे काही जगापासून लपून राहिलेले नाही!!
 
उद्ध्वस्त अवस्थेतील ही "नीती'मान लेडी रिपोर्टर आधीच लंपट 'कदमां'चा बुटक्या आणि 'ढेरपोट्या'ने केलेल्या बदनामीने त्रस्त आहे. तिची स्टोरी 'बेरक्या'ला प्राप्त झाली तेव्हा मन सुन्न  झाले. ती महिला आयोग, लेबर कमिशनर सर्वत्र तक्रार करायच्या मूडमध्ये आहे. त्यासाठी 'बेरक्या' तिला संपूर्ण सहकार्य करेल. तिच्याकडे सारे पुरावे आणि रेकॉर्डिंग आहेत. कुणीही  सुटणार नाही. माध्यमातील महिलांनाच इतकी हीन वागणूक दिली जात असेल तर ती किती दुर्दैवी बाब आहे. 'बेरक्या'ची पेपरवाले पद्मश्री मालक यांना हात जोडून विनंती आहे की,  कुणाच्या पाठीवर मारा; पण पोटावर उगाचच मारू नका. संपूर्ण भायखळा परिसरात आठवडाभर तुमचा पेपर ज्या मुलीने चर्चेत अग्रेसर ठेवला, तिलाच तुम्ही काही दलाल, चमच्यांच्या  कान फुंकण्याने सरळ काम बंद करायला सांगितले. दादा, हे बरे नाही हो! 'मोगलाई'ही इतकी भयंकर नव्हते. आपण तर श्रीमंत छत्रपती शिवरायांचे पाईक ना? महाराजांनी केलेल्या  'कल्याणच्या सुभेदारा'च्या सुनेच्या सन्मानाचा किस्सा पुन्हा सांगायलाच हवा का? आपण भलेही सन्मान नका करू; पण आपल्याकडे चाकरी करणाऱ्या गरिबाघरच्या मुलींवर अकारण  अन्याय होणार नाही, हे तरी पाहणार की नाही!! ज्यांनी तुमच्या पेपरची पताका फडकावत ठेवली, ज्यासाठी आमिषे झुगारले, जीवाचे रान केले... त्यांनाच तुम्ही ही बक्षिसी देणार? दादा,  खरेच तुम्ही असे आहात का हो? निदान सत्याची पडताळणी तर करा. भलेही तो लहान पद्मश्री डॉक्टर तुमचा मित्र असेल; पण त्याला तुम्ही तुमच्या संस्थेत हस्तक्षेप, ढवळाढवळ करू  देणार का हो? त्याची मर्जी राखण्यासाठी तुम्ही पेपरात तुमच्यासाठी झटलेल्या निष्ठावंतांचा बळी घेणार का हो? दादा, 'बेरक्या'चे तुम्हाला नम्र आवाहन आहे की; श्रीमंत छत्रपती  शिवरायांचा 98 सोडा अगदी 1 टक्का तरी अंश वापरा आणि प्रामाणिकपणे अंतर्मानाचा कौल घ्या!! आम्हाला खात्री आहे तुम्ही न्याय कराल...
 
'बेरक्या'चे आवाहन :
महाराष्ट्रातील तमाम पत्रकार मित्रहो, तुम्ही असे मुळीच समजू नका की तुम्ही एकटे आहात. भलेही तुमच्या आनंदात राहू देत पण संकटाच्या समयी 'बेरक्या' तुमच्या पाठीशी ठामपणे  उभा आहे. तमाम महिला पत्रकार या आमच्या भगिनी आहेत. त्यांचा मान-सन्मान आणि स्वाभिमानाची जपणूक व्हायलाच हवी. 'बेरक्या' सदैव आपणा सर्वांच्या साथीला उभा आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्राने आजवर इन-हाउस अशा महिला छळाच्या तक्रारींचे निवारण करणारी समिती स्थापन केलेली नाही. महिलांना पत्रकारितेत काम करणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेय. माता-भगिनींच्या हित रक्षणासाठी शीर तळहाती घेवून लढल्याचा इतिहास सांगणारा महाराष्ट्र आमचा... आज आम्ही इतके बधीर, अलिप्त का झालो आहोत? नाही चालणार हे असे यापुढे...  हक्काने आवाज द्या. तुमची दु:ख, चिंता, व्यथा, वेदना आम्हाला नि:संकोच कळवा. अनेकदा मालक मंडळीही वाईट नसतात. प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानी योग्य जाईलच असे नाही. मधले  दलाल हरामखोरी करतात. यापुढे आम्ही मालक आणि कर्मचारी, अगदी शेवटचा घटक यातील दुवा बनून .... आम्ही तुमचा आवाज बनून मालकांपर्यंत पोहोचू... आपल्याला संघर्ष नव्हे  तोडगा हवाय.... लढाई नव्हे न्याय हवाय... चला, एकमेकांच्या साथीने पत्रकारितेतील आपलं जगणं सुसह्य करूया ...
'बेरक्या'कडे ई-मेल berkya2011@gmail.com या आयडीवर पाठवा. आपली ओळख पूर्णत: गुप्त राखली जाईल.
 
प्रिंट तसेच टीव्ही/वेब मीडियातील सर्व पत्रकार मित्रहो, कंत्राटी, एक वर्षे-तीन वर्षे करार किंवा कोणत्याही स्वरूपातील कर्मचारी, व्हाउचरवर सेवा देणारा पत्रकार-वार्ताहर तसेच वृत्तपत्रातील कोणत्याही विभागात काम करणारे कर्मचारी ..... आपल्याला जर कुणी अचानक कामावरून कमी केले किंवा उद्यापासून कामावर येवू नको सांगितले, कुणी राजीनामा दे म्हणून दबाव आणत असेल, किंवा कोणत्याही मार्गाने वरिष्ठ छळत असतील तर सर्वप्रथम ऑनलाईन तक्रार महाराष्ट्र शासनाच्या लेबर कमिशनरकडे म्हणजे कामगार विभागाकडे दाखल करा. तुमच्याकडे नियुक्तीपत्र असो किंवा नसो, तुम्ही लेबर/वर्कमन असो की मैनेजरीअल पोजिशन होल्डर ... सर्वप्रथम तक्रार करा ... ते अगदी सहज-सोपे आहे. लक्षात ठेवा आपली हक्काची लढाई सर्वप्रथम आपण स्वत: लढायला शिका ... काही अडले, साथ हवी असेल, मार्गदर्शन हवे असेल तर 'बेरक्या' आहेच..
 
प्रिंट तसेच टीव्ही/वेब मीडियातील पत्रकारितेतील माता-भगिनीनो, आपला जर कार्यालयात/'वर्कप्लेस'च्या ठिकाणी छळ होत असेल, कुणी त्रास देत असेल, लगट-लंपटपणा-लोचटपणा करत असेल, मुद्दाम आडवे-तिडवे बोलणे, शेरेबाजी किंवा इशारेबाजी करत असेल, वरिष्ठ कामाच्या निमित्ताने मुद्दाम छळत असतील तर आपण आता अगदी सहज ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता...