सीएनक्सविरुद्ध फुसके आरडीएक्स!


महाराष्ट्राच्या मानबिंदूने नागपूरसह काही आवृत्त्यांतून सीएनक्स ही एक्सक्लुझिव्ह बातम्यांची स्वतंत्र पुरवणी देण्यास सुरुवात केल्यानंतर त्याची हुबेहूब नक्कल दैनिक देशोन्नतीने केली आहे. फरक एवढाच की, स्वतंत्र पुरवणीऐवजी अकोल्यात लाईव्ह पुरवणीतच स्वतंत्र तीन किंवा चार पाने देण्यात येत आहे. नक्कल करतानाही अक्कल लागते. नेमका तोच भाग देशोन्नतीच्या नक्कलकारांकडे नसल्याने ही पानेही सद्या जिल्ह्यात हास्यास्पद विषय ठरला आहे. जे विषय एक्सक्लेझिव्ह म्हणून मांडले जात आहेत ते विषय यापूर्वीच देशोन्नतीसह इतरत्र छापून आलेले आहेत. आज घेतलेला पेट्रोलपंपांचा विषयतर एका माजी निवासी संपादकाने ज्युनिअर लोकांकडून तयार करून घेऊन छापून झाला होता. लोकमतची सीएनक्स पुरवणी ही गुणवत्तेच्या बाबतीत देशोन्नतीच्या पानांपेक्षा कितीतरी अधिक सरस ठरत आहे. बातम्यांचे विषय, त्यांची वाचनियता, एक्सक्लुझिव्ह म्हणता येईल, असे मुद्दे, वाचकांना नाविन्यपूर्ण ठरेल, अशी माहिती याबाबी या सीएनएक्समध्ये आहे. परंतु, याच्या नेमकी उलटी परिस्थिती देशोन्नतीच्या फुसक्या आरडीएक्समध्ये दिसते.