मी मराठी नंबर वनवर कसे पोहचले ?

गेली अनेक वर्षे TRP च्या बाबतीत नंबर वनवर राहिलेल्या एबीपी माझाला मी मराठीने मोठा धक्का दिला आहे.दर गुरूवारी एक आठवड्याचा TRP येत असतो.त्यात मी मराठीने बाजी मारली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मी मराठीने कात टाकली आहे.लोकांना जे आवडते ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्याचे श्रेय मुख्य संपादक रविंद्र आंबेकर आणि कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांना द्यावे लागेल. उभयतांचे बेरक्याकडून अभिनंदन...चॅनलचे मालक महेश मोतेवार यांनी संपादकीय टीमला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे या चॅनलचा TRP चांगला वाढत आहे.त्यात निखिल वागळे यांचा शोही मी मराठीला उंचीवर नेत आहे.
लोणावळ्यात मुलीवर झालेले बलात्कार प्रकरण आणि झोपडपट्टीतील गुंडाराज या दोन स्टो-या मी मराठीवर चांगल्याच गाजल्या आहेत.फालतू विषयावर बातम्या करण्याऐवजी लोकांना जे आवडते,तेच देण्याचा प्रयत्न मी मराठीने सुरू केलेला आहे.त्यामुळेच मी मराठीचा TRP वाढल्याचे कळते. TRP मध्ये काही झोल करता येत नाही,ही आकडेवारी खरी असते,असे जाणकारांचे मत आहे.
मी मराठीचा TRP वाढताच,या चॅनलचे पत्ते कापण्याचा प्रयत्न प्रस्थापित चॅनलकडून सुरू झालेला आहे.अनेक ठिकाणी मी मराठी चॅनल केबलवरून गायब करण्यात आलेले आहे.त्याचबरोबर उघडा डोळे बघा नीट चॅनलेचे कांडेंकर आणि एक पाऊल मागे चॅनलचे डॉ.गुडगुडकर यांच्यात मी मराठी चॅनलला मागे कसे खेचायचे याबाबत जे संभाषण झाले,त्याची ऑडिओ क्लीपच मी मराठीच्या हाती लागली आहे.ही तर नीच मनोवृत्ती झाली, असेच म्हणावे लागेल. पण रविंद्र आंबेकर आणि तुळशीदास भोईटे ही जोडगोळी त्याला पुरून उरेल असे अनेकांचे मत आहे .

जाता जाता

बीजेपी माझाचा मराठवाडा ब्युरो मराठवाड्यातील स्ट्रींजरच्या स्टो-या ढापत असल्याची तक्रार आहे.ऐवढेच काय उस्मानाबादमध्ये ऑफीसच्या छतावर उभा राहून मी अमक्या अमक्या ठिकाणी उभा आहे,असे खोटे खोटे भासवत असला तरी चॅनलच्या हे लक्षात कसे येत नाही,हे लोकांना कोडे पडले आहे...म्हणजे लातूर,बीडच्या बातमीवर उस्मानाबादमध्ये ऑफीसच्या छतावर उभा राहून ptc देत आहे.याला कसली पत्रकारिता म्हणावी ? ही तर चॅनलच्या आणि चॅनल पाहणाऱ्यांच्या डोळ्यात चक्क धूळफेक झाली.अश्याने तर बीजेपी माझाचा TRP घसरत नाही ना,अशी शंका येत आहे.