पद्मश्री सध्या
नाशिकमधील एकूणच 'प्रगती'वर नाराज आहेत. त्यामुळे मार्च संपताच त्यांनी
बदलांचा धडाका लावलाय. पहिल्या टप्प्यात त्यांनी 'थंडा थंडा कूल कूल' असा
कुंभमेळ्यात समाधी लावून बसलेल्या 'बुवा'टाईप कारभार काही खरा नाही, हे जाणले. असेच चालले तर प्रतिस्पर्धी दैनिकांवर 'विजय' कसा मिळविणार? सारा घोळ करून ठेवलाय धाकल्या मालकांनी! सूरूवातच चुकली, निवड चुकली!! अर्थात तेव्हा धाकले मालकही काही 'संजया'च्या
दूरदृष्टीचा चष्मा लावून बसलेले नव्हते, त्यांनी विश्वास टाकला आणि
ज्यांच्यावर टाकला त्यांनीच गंडविले. सोलापुरी मातीतील ओबामांनी
रंगाअण्णांच्या शाळेत आपणच घडविलेला पंढरपुरच्या विठोबारायाच्या गावचा
वार्ताहर चक्क संपादक बनवून टाकला आणि त्याला निष्ठेची जहागिरी बहाल केली.
गोदाकाठच्या पुण्यभूमीत हा निष्ठावंत टिळक पथावरही चालला नाही आणि
सातपुरातही उघडा पडला! तरीही सोलापुरी ओबामांनी स्पर्धेतील इतर अनेक चांगली माणसे राहू देत पंढरपुरी चाल चाललीच. अर्थात ओबामांचा हात पाठीवर असूनही शिष्याला काही 'सक्सेस पासवर्ड'
गवसलाच नाही! खानदेशी मातीतील पाटलाने पेपर गावोगावी पोहोचविला, जिल्ह्यात
चौथ्या स्थानी सुरुवातीला धडकावला. पण एका चाकाची गाडी पळून-पळून किती
पळणार? सोलापुरी गुरुजी होते तोवर पंढरपुरी शिष्याची झाकली मूठ ही झाकलेलीच
राहिली. मात्र, सोलापुरी गुरुजींनीच एक दिवस धाकल्या मालकांना आणि
पद्मश्रींनाही टांग मारली; 'निवडणुकीचा हिशेब अर्धवट राखून ठेवत' बुधवाराची
वाट धरली. जाता-जाता पंढरपुरी शिष्याची सोय 'रंगीला औरंगाबादी'कडे लावून देत लक्ष द्यायला, काळजी घ्यायला सांगितले. औरंगाबादी आणि सोलापुरी दोघांची गट्टी जाम कारण एक गुण समान; 'रंगीला' मिजास! औरंगाबादी सापडले ते चोर मात्र सोलापुरी यांचे 'चोरी चोरी-चुपके चुपके'! अर्थात लातुरातून त्यावर एका क्षणात 'प्रकाश' पडू शकेल; मात्र अजून थोडेसे 'पुण्य' गाठीशी असल्याने जगाला ताप नाही; सोलापुरी तूर्तास ओबामाच आहेत! (तशी 'रंगीला सोलापुरी'
ही फाईल 'बेरक्या'कडे तयार होतेच आहे!) असो. तर धाकल्या मालकांनी
ओबामांच्या नादी लागून केलेली चूक प्रत्यक्ष पद्मश्रीनीच दुरुस्त केली.
त्यांनी पंढरपुरी जर्दा गुंडाळून ठेवला आणि नाशिकमध्ये नवे 'किरण' उदयास आले. आता सारे बातमी निवड, वार्ताहर, पान 1, नियोजन-निर्णय वैगेर संपादकीय अधिकार अगदी मन घट्ट, लोखंडी
करून घ्यायला सांगितले गेले आहे. ओबामांच्या शिष्याची अवस्था सध्या
'बिनखात्याचे मंत्री' अशीच आहे. ज्यांच्या अंगी ओबामांनी पंढरपुरी शिष्य
सोपविला ते 'रंगीला औरंगाबादी' महोदयच सध्या अडचणीत आहेत. ते
प्रशिक्षणार्थी पत्रकार-उपसंपादक ते चीफ सब, वृत्तसंपादक, डिझाईनर, फोरमन,
संपादक अशा ऑल-इन-वन भूमिकेत असूनही पद्मश्रींना हा पाने लावणारा व तपासणारा संपादक नकोसा झालाय. कारण तो कुणाला टिकूच देत नाही. त्याचा अक्षरश: काशीनाथ कुलकर्णी
झालाय! या 'रंगीला'चा सोलापुरी सहमिजासी हार्बर लाईनवरच येवून बसल्याने
बेलापूरच्या किल्ल्यातून विस्थापित जुनी मंडळी आता पद्मश्रींना भुरळ घालू
लागली आहेत. त्यांनीच तर पेपरची मुंबापुरीतील फर्स्ट इनिंग यशस्वी केली
होती. तेच सानपाड्यात परतण्याची चिन्हे आहेत. त्यांच्यासह विस्थापित नगरभूषण हे बेळगावच्या आश्रयाला जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचे तिथे जमले नाही तर मग पद्मश्रींना 'एकसे भले दो' अशी जणू पद्मसंजीवनी लाभेल. सध्या तरी हार्बर लाईनवरील तिघे संपादक हे पद्मश्री यांच्या पेपरचा कधीतरी शिक्का पडलेलीच माणसे आहेत. पद्मसंजीवनी डोस घ्यायचा तर त्यासाठी 'रंगीला' मिजास काय कामाचा? त्यामुळे कदाचित ....