वाचकांना जोडून ठेवण्यासाठी बक्षीस योजनांची घोषणा
पुणे - मी मराठी लाईव्ह लवकरच पुण्यात येत असल्याने या नवख्या वृत्तपत्राची पुढारी अन् लोकमत या बलाढ्य वृत्तपत्र समूहांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. पुणेरी वाचकांना जुळवून ठेवण्यासाठी या दोन्ही वृत्तपत्रांनी वाचकांसाठी बक्षीस योजनांची घोषणा केली आहे. त्याची शहरात जोरदार जाहिरातबाजीही केली जात असून, पुढारीने फ्रेंच जॅकेटसह शहरात जागोजागी फ्लेक्स बोर्डही लावले आहेत. सकाळने मात्र नवख्या दैनिकाचा फारसा धसका घेतल्याचे जाणवत नाही.
दैनिक लोकमतने वाचक जाहिरातदार योजना सुरु केली असून, २०० रुपयांचा धनादेश अन् दरमहा ७० रुपये वितरकांना असे १८८० रुपये घेऊन वर्षभर लोकमत अन् टप्प्याटप्प्याने १४५० रुपयांची हमखास बक्षीस देण्याची योजना जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, पुढारीने मात्र छप्परफाड बक्षीस योजना जाहीर करून पुण्यात धुमाकूळ घातला. ट्रेझर हंट योजना या नावाने ही बक्षीस योजना जाहीर केली असून, प्रकाशित केल्या जाणार्या १२० पैकी १०० कुपन्सच्या चिकटकात्रणांचा लकी ड्रॉ काढून १२१ हिरे, ६५ तोळे सोने, अन् १५ किलो चांदी वाटू असे पुणेकरांना आश्वासित केले आहे. शहरात सद्यातरी या दोन योजनांचीच चर्चा सुरु आहे. आपल्या योजनेच्या प्रचारासाठी फ्रेंच विंडो जॅकेटसह शहरात जागोजागी फ्लेक्स बोर्डही पुढारीने लावले आहे. मी मराठी लाईव्हच्या आगमनाचा ग्रामीण भागासह शहरी भागात पुढारी व लोकमतसह महाराष्ट्र टाईम्सच्या काउंटर सेलला जास्त फटका बसेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. प्रभात, केसरी ही शेवटच्या घटका मोजणारी दैनिके चांगलीच अडचणीत आली असून, महाराष्ट्र टाईम्सलाही मी मराठी लाईव्हचा सर्वाधिक फटका बसणार आहे. मटाचे निवासी संपादक पराग करंदीकर हे पुण्यातले असूनही आपला काहीच प्रभाव दाखवू शकले नाहीत. तीच गत पुढारीच्या गोपाळ जोशींचीही झाली आहे.