छत्रपती
शिवाजी महाराज म्हणजे सर्वकालीन उत्तुंग व्यक्तिमत्त्व. महाराजांनी कधी
जात-धर्म याला थारा दिला नाही. त्यांच्या लेखी गुणवत्ता सर्वश्रेष्ठ!! अशा
या महाराजांच्या जयंतीचीच बातमी गुणवत्ता, नंबर वन व स्मार्टनेसचा टेंभा
मिरविणाऱ्याना धडपणे लिहीता येवू नये, हे आजच्या मराठी पत्रकारितेचे
दुर्दैव!!
'बेरक्या'ने काही दिवसांपूर्वी 'मटा'ची बिनपाण्याने चंपी केली
होती; त्यानंतर नाशिकमधील अनेक वाचक व पत्रकारांचे रोजच 'मटा'मधील
चुकांबाबतचे ई-मेल धडकत आहेत. 'मटा' वाचवत नाही, ही सर्वांचीच एकमुखी
प्रतिक्रिया!! कुठल्यातरी गाण्यात ती बाई म्हणते, मी कात टाकली तसे यांनी
जणू लाज टाकलीय!! 'नाशिक मटा'ने 9 मार्च रोजी पान 3 वर शिवजयंती साजरी झाल्याची
बातमी ठळकपणे प्रकाशित केलीय. या बातमीत सर्वत्र 'शिवाजी महाराज' याऐवजी
'शिवाजी xxx' असा उल्लेख करण्यात आला आहे. ब्राह्मणी मनोवृत्तीच्या
'मटा'मधील स्टाफने जाणून-बुजून बहुजन समाजातून पुढे आलेल्या सर्वकालीन
उत्तुंग युगपुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचा चालविलेला हा खेळ
आहे. मात्र, हा ब्राह्मणी कावा स्वत:ला 96/98 कुळी समजणाऱ्या देशमुखांनी
तरी हाणून पाडायचा की नाही? गुणवत्तापूर्ण अंकाचा टेंभा मिरवित स्वत:चीच
पाठ थोपटून घेणाऱ्या अशोकराव पानवलकरांना आता हे कसे रुचते? अंकाची शहरात
इतकी छी-थू होतेय, ब्रांडची पार अब्रू जातेय तरीही हे मौनीबाबा इतके
स्थितप्रज्ञ कसे?
नाशकात,
जळगावात ... सर्वत्र पानवलकर आणि त्यांचे फ़ाईन्ड्स आणि त्यांचे
प्रोडक्ट्सही टोटली फेल्युअर ठरले आहेत. ग्लोबली लोकल आणि सुपर-लोकलच्या
नादात 'मटा'चा मूळ चेहरा पार विद्रूप झालाय.. पानवलकरांची अवस्था आपलेच दात
आणि आपलेच ओठ अशी झालीय. स्वत:च्या चुकीच्या निवडीच्या अपयशाची चूक
कुठल्या तोंडाने कबूल करणार? म्हणून आपले गिरे भी तो टांग उपर असे चाललेय
सध्या!! किती दिवस दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पीत निर्णय घेत राहणार??
'उघडा डोळे, बघा नीट'... आजूबाजूला काय गुणवत्तापूर्ण लोकांची कमतरता आहे
काय? पण यांना मराठा, साळी-माळी-तेली नकोय... यांना हवाय 'कर' नाहीतर
'कुलकर्णी'... 'लांबे' नाहीतर 'तांबे'!!
चालू
द्यात 'मटा'चा बट्ट्याबोळ... 'बेनेट-कोलमन'च्या जैनांकडे उधळायला बक्कळ
पैसा आहे.. जळगावात जशी वर्गणी स्कीम संपल्यावर फे-फे उडाली, तेच नाशकात
होणार.. शुभेच्छा ... महाराष्ट्रातील लहानग्या, तरुण पिढीचे व्याकरण
बिघडविण्यासाठी अशोकराव पानवलकर आणि त्यांच्या काळातील मटा यांचे नाव
इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल.. पुनश्च शुभेच्छा ...
20 मार्च रोजी पान 1 वरची गुणवत्तेला आणि व्याकरणाला घंटा दाखविणारी ही आणखी एक बातमी पाहा :
हेही जरूर वाचा :