बारामती – राज्याची राजकीय राजधानी असलेल्या बारामतीत पवारप्रेमी लाईव्ह
पत्रकारांनी वसुलीचा धंदा उद्छाद मांडला आहे. चक्क पवारांकडूनच वसुली केल्याने
सोमवारी टंचाई बैठकीतून वसुली टोळीला पवारांनी बाहेरचा रस्ता दाखवला. आपल्या हाती
समाजाच्या भल्यासाठी पत्रकारितेचं शस्त्र देण्यात आलं आहे. हे विसरलेले लाळघोटे
मंडळी एका हाताच आपल्या वृत्तवाहिन्याचा माईक तर घड्याळ असलेल्या दुसर्या हातात
पक्षाचा अदृश्य झेंडा घेऊन ही मंडळी मानाने बारामतीत मिरवत बारामतीत फिरतात. पत्रकारितेत
वावरणार्या या मंडळींनी आता चक्क दादांनाच दगा दिल्यावर अजित पवारांनी दादागिरीचा
नमुना पहायला मिळाला. तुमचं बैठकीत काय काम असा सवाल विचारून बाहेर हाकलले. मात्र
घटनेचा निषेध करायला नेमस्त मंडळी व लाईव्ह मंडळींनी फारसी आक्रमक भूमिका घेतली
नाही. ही तथाकथित लाईव्ह मंडळींच पत्रकारितेचा गळा घोटत आहेत.
बारामती परिसरातील नुकत्याच झालेल्या सहकारी साखर
कारखान्यांच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडून आपल्या तुंबड्या, झोळ्या फाटेपर्यंत
भरगच्च भरल्यावर एका पवारांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची ध्वनीचित्रफित लाईव्ह
पत्रकारांच्या हाती आली. याचे भांडवल करून त्यांनी राष्ट्रवादी काग्रेसच्या
पदाधिकार्यांकरवी पैसे देखील उकळले. तेवढ्यावर शांत न बसता अजित पवारांच्या
आक्षेपार्ह विधानाची मोठ्या वर्तमानपत्रात बातमी छापून आणण्याचे कंत्राट पवार
विरोधकांकडून लाईव्ह मंडळींनी घेत रात्रीत लाखो रूपये कमावण्याची योजना आखली.
त्यावर काही वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी बातमी न लावल्याबद्दल उलट लाईव्ह पत्रकारांना
जाब विचारत, आम्हाला शिळ्या बातम्या देऊ नका असं ठणकावून सांगितल्याने
लाळघोट्यांचे लाखो रूपये कमावण्याचे लाईव्ह स्वप्न भंगले. समाजातील कोणताही प्रश्न
असो...पैसे द्या असा लाईव्ह मंडळींचा होरा असतो. अत्याचारग्रस्त पिडित महिलांचे
लैगिक शोषण करण्यात ही मंडळी मागे नाहीत. बारामती शहरातील भिगवण रोडवरील एका
तारांकित हाटेलमध्ये पतीच्या जाचाला कंटाळलेल्या पिडितेचा बाईट घेण्याच्या
बहाण्याने लाईव्ह मजा ही मारली. पिडीत लाजलज्जेस्तव गप्प बसली.
तीन
हत्ती चौकातील लाईव्ह उर्फ बांधकाम व्यावसायिकाने भारत संचार निगमकडून लाखो रूपयाची
लिज लाईन घेत चांगल कार्यालय थाटलं आहे. बारामतीमधील सर्वच लाईव्ह मंडळी येथून
आपला कारभार हाकतात. कोणाताही प्रश्न असला की, त्याला या लाईव्ह कार्यालयात बोलवून
घेतले जाते. नंतर सुरू होत आर्थिक शोषण.. त्यामुळे बारामतीतील नेमस्त पत्रकार जाम
वैतागले आहेत. सांगणार तरी कोणाला आपलेच दात अन् आपलेच ओठ...