आठवले सर, अपेक्षाभंग करू नका !


विलास आठवलेंसारखा अनुभवी पत्रकार जय महाराष्ट्रमध्ये आल्यापासून चॅनेलची घडी आता बसू लागली आहे. या आधी लांबेंच्या काळात अनेकांना मनमानी पद्धतीने काढण्यात आलं. अपमानास्पद वागणूक देण्यात आली. मात्र आता हे सर्व बदललं आहे. आठवले सरांची कामाची शैली सगळ्यांच्याच पसंतीला पडली आहे. चॅनेलमध्ये वेगवेगळे चर्चात्मक कार्यक्रम होत आहेत. सर्व टीमचा हुरूप वाढला आहे. मात्र याच वाहिनीतून कामचुकार असल्यामुळे काढलेले एक 'ओझे' पुन्हा नोकरीत का घेतले ? असा प्रश्न सर्व विचारत आहेत. बुलेटिन 'वाचणे' आणि सिगरेट फुंकणे यात ते 'ओझे' एक्सपर्ट आहे. तर दुसरीकडे एबीपी माझातून काढून टाकण्यात आलेले 'माणिक' रत्नही मोठ्या पदावर येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेनं सगळ्यांनाच धक्का बसलाय. कारण एका महिला पत्रकाराच्या गंभीर आरोपानंतर या रत्नाची एबीपी माझातून हकालपट्टी करण्यात आली होती. तिथे त्याने व्हिडिओ एडिटर बरोबर मारामारीही केली होती. हे असलं 'कॅरेक्टर' आल्यास जय महाराष्ट्र चॅनेलमधलं वातावरण पुन्हा खराब होण्याची भीती आहे.