दीपक पटवेची चौकशी व्हावी

हेमंत पाटील जळगाव महापालिकेचे बीट अतिशय उत्तमरित्या सांभाळीत असताना त्याचे बीट काढून घेत त्याच्याकडे कोणतेही पूर्णवेळ, स्वतः चे निश्चित असे हक्काचे बीट का ठेवले नाही? हेमंत पाटीलचे बीट कुणाला दिले? 12 वर्षे अनुभव असलेल्या हेमंतवर त्याला अपमानास्पद वाटेल अशी ट्रेनी, नव्या माणसाची जबाबदारी कुणी दिली? या सर्वांची चौकशी व्हावी. 
'दिव्य'वाल्यांनी मुद्दाम AD दाखल होवू दिली. इतक्या निश्चयाप्रत येणारा माणूस कोणतीही "नोट" लिहून गेला नाही; हे मनाला पटतच नाही!! असे होवूच शकत नाही. पटवेला वाचविण्यासाठी ही "नोट" गायब करण्यात आली असावी, या संशयास पुरेपूर वाव आहे. मृतदेह 6 तास घटनास्थळी पडून होता. "दिव्य"चे 5-6 कर्मचारी तोवर घटनास्थळी जावून आले; त्यांनी हेमंतचे पाकीट(वॅलेट) वेळेत, खिसे तपासल्याचे सांगितले जातेय. हेमंतचा मोबाईल घटनास्थळी सापडला नाही की त्याचे अवशेष, तुकडेही सापडले नाहीत. तोही पट्वेच्या पंटर्सनीच लंपास केलेला असावा. हरामखोर पट्वे आणि त्याचे पंटर्स आता कौटुंबिक कारण, घरगुती भांडण असा अपप्रचार करीत आहेत. मी छातीठोकपणे, 1000% खात्रीने या सर्व हरामखोरांना सांगतो की तुमचा, 'दिव्य'मध्ये कुणाचा नसेल एव्हढा हेमंतचा संसार सुखाचा होता; त्याचं बायकोबरोबर जबरदस्त 'ट्यूनिंग' होतं!!
हरामखोर नराधमांनो, मृत्यूनंतर तरी त्याची बदनामी, अपप्रचार आणि कुटुंबाला क्लेश होईल, असे काही करू नका. कशाला त्याच्यावर 'व्यसनी'वैगेरे शिक्के मारताय तुम्ही? हा स्वार्थी, नीचपणा बंद करा...!
हेमंत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाचा बळी आहे आणि जातीयवादी असलेल्या दीपक पटवेने या गरीब बहुजन मुलाचा बळी घेतलाय. काय "देशपांडे", "राजहंस" खरे आहे ना हे? कुठे गायब केलीत आपण हेमंतची "नोट"? 
अकोल्यात "देशोन्नती"त 5-7 वर्षांपूर्वी असाच वर्कप्लेस हॅरासमेंट'ने एका बहुजन पोराचा बळी गेला होता. त्यावेळी संपादकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. HR वाल्याला अटक झाली होती व प्रकाशभाऊ पोहरे फरार होते. आताही दीपक पटवेच्या मुसक्या आवळल्या तरच हेमंतच्या अकाली, दुर्दैवी 'एक्झिट'चे गूढ़ उकलू शकेल. हेमंत पाटील हा वर्कप्लेस हॅरासमेंट आणि कॉर्पोरेट रॅगिंगचाच बळी आहे.