अकोल्यात दिव्य मराठीचे दिवे विझू लागले

अकोल्यात प्रचंड गाजावाजा करीत सुरु करण्यात आलेले , दिव्य मराठीचे दिवे विझायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला दिव्य मराठीने खुप पैसा खर्च केला.आज मात्र दिव्य मराठीचा पूर्णता बैंड वाजविला आहे.
अकोला येथे सिव्हिल लाईनमध्ये दिव्य मराठी चे दोन मजली कार्यालय थाटण्यात आले होते . आता खर्च कमी करण्याच्या नावाखाली वरचा मजला रिकामा करण्यात आला आहे.संपादकीय तसेच एच. आर. विभाग एकाच मजल्यावर आले आहे. 
दोन वर्ष कुणालाच हा खर्च दिसला नाही. अकोला पाठोपाठ अमरावती येथे जोशी मार्केट मधे असलेल्या दिव्य मराठीचे कार्यालय सुध्दा हटविले जाऊ शकते . आता खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा सपाटा कंपनीने लावला आहे. यवतमाळ चे सहा तसेच बुलढाणा येथील चार कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना थेट घरी रिलीव लेटर पाठविण्यात आले आहे . या व्यतिरिक्त अमरावती येथील तसेच नागपुर येथील काही कर्मचाऱ्यांना बदलीच्या नावाखाली
कामावरून कमी करण्याची खेळी सुद्धा कंपनी तर्फे सुरु करण्यात आली आहे. अमरावती येथील जाहिरात विभागातील काही कर्मचाऱ्यांना काढण्याच्या सुद्धा हालचाली सुरु झाल्या आहेत.