सांगली - दै सकाळमध्ये ज्वलंत स्वरूप सीइओ म्हणून रुजू झाले आणि त्यांची छाप दैनिकात लगेच दिसून आली. दैनिकात सीइओ नेमण्याची परंपरा सुरु करणाऱ्या बेळगाव तरुण भारत मध्ये मात्र उलटे घडत आहे. दीपक प्रभू यांच्या नियुक्तीला ६ वर्षे झाली मात्र अजूनही ते चाचपडत आहेत. त्यांच्या कार्यकालात पश्चिम महाराष्ट्रात दैनिकाची जोरात अधोगती सुरु आहे. कोल्हापूर युनिटचे निवासी संपादक दशरथ पारेकर यांनी राजीनामा दिला आहे. सांगलीचे वितरण प्रतिनिधी गिरीश के. बी. राजीनामा देऊन दुसर्या व्यवसायात स्थिरावत आहेत. लतीफ जमादार आणि अभिजित या सांगलीच्या दोन ओपेरेटरनि राजीनामा दिला आहे. नव्याने नेमलेल्या उपसंपादकाने जनाप्रवासचा रस्ता धरला आहे. सोलापूरचे पार्सल अवघ्या २०० अंकावर आले आहे. त्यातही १०० अंक घेणाऱ्या वितरकाने अंक कमी करा म्हणून पत्र पाठवले आहे. सातारा आवृत्तीची प्रिंट ओर्दरही ५ हजारावर आली. कोल्हापुरात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही असा प्रकार आहे. कर्णधार नसल्यामुळे सगळे खेळाडू अंधारात आहेत. मुंबई आवृत्तीला निवासी संपादक नाही. ती आवृत्ती झपाट्याने खाली येत आहे. माणसे सांभाळता आली नाहीत असे म्हणत सीइओ संपादकीय विभागाला दोष देत होते. आता त्यांच्याच काळात माणसांची सगळ्यात मोठी गळती झाली आहे. काय होणार पुढे याची चिंता कर्मचार्यांना सतावते आहे.