प्रसन्ना जोशीने केले बेरक्याचे कौतुक

पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ, पुणे शहर पत्रकार संघ व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्तविद्यमाने भोसरी येथे ४० वे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन शनिवारी सुरु झाले. रविवारी या अधिवेशनात 'माध्यमांना सामाजिक जबाबदारीचे विस्मरण झालय काय?' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे, एबीपी माझाचे प्रसन्ना जोशी, शिवसेनेच्या आमदार डॉ. निलम गो-हे, जन आंदोलनाच्या कार्यकर्त्या उल्का महाजन, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, राजकीय विश्लेषक विश्मभर चौधरी सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे होते. 
या परिसंवादात बोलताना जोशी म्हणाले कि, बेरक्या सारखी एखादी वेबसाईट आमच्यावर अंकुश ठेवून असते.