रूबेन वाळकेची देशोन्नतीतून हकालपट्टी

अकोला - आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करून पैसे वसुली करणार्‍या देशोन्नतीत वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहणार्‍या रुबेन वाळके याची अखेर देशोन्नती प्रशासनाने हकालपट्टी केली आहे. यापूर्वीची दोन प्रकरणे छोटे मालक ऋषी  पोहरे यांनी माफ केली होती. तथापि, वाळकेच्या बातम्यांवर सेन्सारशिप लागू करण्यात आली होती. आता छोटे मालक जेव्हा विदेशात आहेत, तेव्हा खुद्द देशोन्नतीकारांनीच वाळके याच्या हकालपट्टीचा निर्णय अमलात आणून तशी चौकटही देशोन्नतीत 12 जूनच्या अंकात प्रकाशित केली आहे.
देशोन्नतीच्या एका माजी निवासी संपादकाने यापूर्वी वाळकेच्या सर्व भानगडी देशोन्नती प्रशासनाकडे मांडल्या होत्या. परंतु, मनुष्यबळाची कमतरता हे कारण सांगून वाळके याला जीवदान मिळत गेले होते. परंतु, देशोन्नतीच्या प्रतिष्ठेबद्दल कमालीच्या जागृत असलेल्या देशोन्नतीकारांनी मात्र वाळकेला घरी रवाना करून पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचीदेखील तयारी चालवली आहे.

प्रेसवरील कर्मचार्‍यांची संघटना करण्याचा प्रयत्न
कर्मचारी संघटनेमुळे देशोन्नतीचे नागपूर युनीट बंद पडले आहे. तोच प्रकार वाळके हा अकोल युनीटमध्येही करण्याच्या प्रयत्नात होता. पगारवाढीसाठी संपादकीय कर्मचार्‍यांना फितवून त्याने नेहरू बागमध्ये एक मिटिंगदेखील घेतली. व दिवसभर संप करण्याचा प्रयत्न केला. तथापि, ही बाब वेळीच मालक प्रकाश पोहरेंना समजताच त्यांनी तातडीने हालचाल करून वाळकेचे इरादे उधळून लावले. त्याबद्दलही वाळके देशोन्नती प्रशासनाच्या डोक्यात बसला होता.