मुंबई मिररला आली उशिरा जाग

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील अनसुर्डा गावांत एप्रिल महिन्यात आंबेडकर जयंती मिरवणुकीवरून दलित आणि सवर्णामध्ये वाद निर्माण झाला होता.त्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत हा वाद तेव्हाच मिटवला आहे.आता या गावांत कसल्याही प्रकारचा वाद किंवा तेढ नसताना,मुंबई मिररला उशिरा जाग आली आहे.तब्बल दीड महिन्यानंतर आज दि.8 जून रोजी यासंदर्भात पहिल्या पानावर स्पेशल रिपोर्ट देण्यात आला आहे.
अश्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या तेही इतक्या उशिरा देवून आगीत तेल ओतण्याचे काम मुंबई मिररने केले आहे.
http://epaperbeta.timesofindia.com/
http://www.mumbaimirror.com/