महाराष्ट्रात समृध्द जीवनसह अनेक चिटफंड कंपन्यांनी ४० हजार कोटी रूपयाला गंडा घातला आहे.याबाबतची तक्रार भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाखल केली आहे.
राज्यातील समृध्द जीवनसह १६२ कंपन्या बोगस असल्याचे सेबीने यापुर्वीच जाहीर केलं आहे.या कंपन्याची सध्या चौकशी सुरू आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांत समृध्द जीवनच्या पैश्यावर सुरू असलेल्या लाइव्ह इंडिया,मी मराठीचा बाजार उठणार का ? याकडं लक्ष वेधलं आहे.
ज्या चॅनलवर वागळे नैतिकतेच्या गप्पा मारतात,ते चॅनल चिटफंडच्या पैश्यावर चालते,हे वागळेंना माहित नाही का ?