मुकुंद फडके यांचा पुढारीला रामराम

कोल्हापूर - पुढारीचे दोन वरिष्ठ कार्यकारी संपादक दिलीप लोंढे आणि सुरेश पवार यांच्यातील अंतर्गत गटबाजी,पद्श्रीचे होणारे दुर्लक्ष आणि काहीच नविन करण्याची संधी मिळत नसल्यामुळे सहाय्यक संपादक मुकुंद फडके यांनी आज पुढारीला रामराम केला.
पद्श्रीच्या कोल्हापूर आखाड्यात सध्या 'राजारामपुरी केसरी' दिलीप लोंढे आणि 'भवानी मंडप केसरी' सुरेश पवार यांच्यात तुंबळ शीतयुध्द सुरू आहे.त्यात पंत नव्हे पंच मुकुंद फडके यांची मोठी पंचायत झाली होती.याची बाजू घ्यावी तर त्याचा त्रास आणि त्याची बाजू घ्यावी तर यांचा त्रास अशी दुहेरी कोंडी झाली होती.
मुकुंद पंतांचा पुढारी प्रवेश पावने दोन वर्षापुर्वी नव्याने झाला होता.त्यावेळी 'राजारामपुरी केसरी' दिलीप लोंढे पुढारीत नव्हते.त्यांनी नुकताच राजीनामा दिला होता.फडके आल्यानंतर एक महिन्यात ते परत आले.त्यानंतर काही दिवसांपुर्वी राजीनामा देवून पुन्हा आले.त्याच्या 'आओ जावो घर तुम्हारा 'यामुळे पंतांची चांगलीच पंचायत झाली होती.पद्मश्री मात्र कोंबडीला दाणे टाकून,झुंज पहावी तसे मजा घेत आहेत.त्याचा त्रास अनावर झाल्याने पंतांनी अखेर पुढारीला सोमवारी कायमचा रामराम केला.
पंत पुन्हा बेळगाव तरूण भारतमध्ये जाणार,अशी अफवा कोल्हापूरात पसरली आहे.पण पंतांनी त्यास नकार दिला आहे.