गायकवाडांचा खोटारडेपणा उघड


नव जागृती चॅनलच्या संदर्भात बेरक्यावर वारंवार बातम्या झळकल्या आहेत.दोन बातम्यावर मालक राज गायकवाड यांनी कमेंट लिहिली आहे.त्यात म्हटले आहे की,सर्व कर्मचारी आणि स्ट्रींजरचे एप्रिल आणि मेचे पेमेंट आज जमा करत आहेत.पंरतु गायकवाड किती खोटे बोलतात,हे पुन्हा एकदा सिध्द झालेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना एप्रिलच्या पगारापोटी पाच हजार अॅडव्हान्स देण्यात आले होते.उर्वरित रक्कम काही मोजक्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.सर्व कर्मचाऱ्यांना पेमेंट न देता केवळ मोजक्या कर्मचाऱ्यांना देवून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा डाव रचण्यात आला.परंतु ज्यांना पेमेंट मिळाले,तेही आंदोनलात सहभागी झालेले आहेत.स्ट्रींजरला तर दमडाही मिळाला नाही.मोजक्या कर्मचाऱ्यांना तेही एप्रिल महिन्याचे उर्वरित पेमेंट देण्यात आले आहे.जवळपास 70 कर्मचारी असताना,मोजक्या कर्मचाऱ्यांना तेही एप्रिलचे उर्वरित पेमेंट देण्यात आलेले आहे.
सर्व कर्मचाऱ्यांचा एप्रिलचा उर्वरित पगार,मे,जून आणि जुलैचा पुर्ण पगार आणि पुढील 3 महिन्याचा पगार देण्यात यावा,यासाठी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत.स्ट्रीजरचाही एप्रिल,मे आणि जूनचे पेमेंट मिळाले नाहीत.तेही कर्मचाऱ्यांच्या आंदोनलास पाठींबा देत आहेत.
राज गायकवाड,अश्या खेळ्या करून कधीच यशस्वी होणार नाहीत.तुमचा खोटेपणा पुन्हा एकदा सिध्द झालेला आहे.तुमच्या शब्दावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही,असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.