नव जागृतीच्या गायकवाडांविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुणे - नव जागृतीसाठी रात्रंदिवस मेहनत करूनही कामाचा मोबादला न देता,चॅनल बंद करणा-या राज गायकवाड यांच्याविरूध्द काही रिपोर्टरंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ई-मेद्वारे तक्रार केली आहे.त्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून,हे प्रकरण चौकशीसाठी लेबर कमिशनरकडे सोपवण्यात आले आहे.
नव जागृती चॅनल जानेवारी २०१५ मध्ये सुरू झाले होते.राज्यातील अनेक रिपोर्टरंनी चांगल्या बातम्या आणि स्टो-या देवून हे चॅनल नावारूपास आणण्याचा प्रयत्न केला.मात्र मालक गायकवाड यांनी त्यांचे पेमेंटच दिले नाही.एप्रिल,मे आणि जूनचे पेमेंट वारंवार मागणी करूनही न दिल्यामुळे यासंदर्भात काही रिपोर्टरनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे तक्रार पाठवली होती.त्याची या कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे.
नव जागृती चॅनलचे कर्मचारी एकीकडे रस्त्यावर उतरले असताना,दुसरीकडे थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्याचबरोबर अनेक कर्मचारी आणि रिपोर्टर आता पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करणार आहेत.त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.