जय महाराष्ट्र आणि टीव्ही 9ला पुन्हा लागणार गळती

जय महाराष्ट्रमध्ये संपादकांची नवी टीम आली आहे. मात्र इथल्या कर्मचा-यांना त्यांच्याविषयी विश्वास वाटत नाही. पगार सातत्यानं जोपर्यंत 1 तारखेला होत नाही, तोपर्यंत काही मजा नाही. त्यामुळे कर्मचा-यांनी आयबीएन लोकमतला प्राधान्य दिलं आहे. डेस्कवरील एकाचं बुलेटिन प्रोड्युसर म्हणून आयबीएनमध्ये काम झालं आहे. तर जवळपास अर्ध्या महिला अँकर आयबीएनच्या संपर्कात आहेत. आयबीएनमधील अँकर निखिल वागळेंच्या चॅनेलमध्ये गेल्यानंतर, जय महाराष्ट्रच्या अँकर्सना बोलावण्यात येणार आहे. तर दोन प्रोड्युसर्स एबीपी माझा आणि झी 24 तासमध्ये प्रयत्न करत आहेत.
टीव्ही9च्या दोन अँकर्स आणि दोन प्रोड्युसर्सचे आयबीएन लोकमतमध्ये इंटरव्ह्यू झाले आहेत. ते ही बोलावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर अजून दोन अँकर झी 24 तास आणि वागळेंच्या चॅनेलच्या संपर्कात आहेत. नातेवाईक, नाट्यकलावंत आणि कॅमेरामन यांना बुलेटिनमध्ये वाव दिला जात असल्यानं अँकर्समध्ये नाराजी पसरल्याचं कळतं.
..........................

झी 24 तास या वाहिनीत अण्णाची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. साधारण चार वर्षापूर्वी इथल्या कुप्रसिद्ध त्रिकुटाने स्वार्थासाठी अण्णाचा बळी घेतला. तसे या त्रिकुट आणि त्यांच्या साथिदारांनी अनेकांचे बळी घेतले, गेम केले. पण अण्णाचा विषय वेगळा आहे. चार वर्षापूर्वी मंदार परब संपादक होते. तर अनंत सोनवणे आऊटपूट एडिटर. परब आणि सोनवणे दोघांचीही अण्णावर मर्जी वाढत चालली होती. त्यामुळे लिचमधून डेस्कवर आलेल्या काम्रेडच्या स्वप्नातलं पद धोक्यात येऊ लागलं होतं. कोकणातला शिवसैनिक असलेल्या काळू मामाला कोणी विचारेनासं झालं. मग काय, एक कॉम्रेड, दुसरा शिवसैनिक यांनी कोल्हापुरातला मुश्रीफ समर्थक एनसीपीवाला गडी बरोबर घेतला. कृष्णकृत्यात हा गडी आघाडीवर असतो. तिघांनी मिळून अण्णाला टिंगलीचं पात्र केलं. अण्णांचा डेस्कवरचा दबदबा कमी करण्यात त्यांना यश येऊ लागलं. तोंड न उघडणारे अण्णासमोर बोलू लागले. अण्णांनीही अधिक वेळ न दवडता मानबिंदू जवळ केला. आज अण्णा 24 तासमध्ये नाहीत. मात्र त्यांच्याविषयी आजही आदर आहे. तर हे त्रिकूट इथंच आहे. आणि सगळ्यांच्या शिव्या खात आहे. अर्थात त्रिकूटाचा फायदाही झाला. कृष्णकृत्यला रिपोर्टिंगची बिदागी मिळाली. कॉम्रेडला शिफ्ट सांभाळायला मिळाली. तर काळू मामाला स्पर्धक राहिला नाही.