'पुढारी'ची 'लोकमत'ला सणसणीत चपराक


'लोकमत आता कोल्हापुरात पुढारी',असे कोंल्हापुरातील चौकाचौकात होर्डिग्ज लावणा-या दर्डाशेठच्या 'लोकमत'ला पद्मश्रीच्या 'पुढारी'ने सणसणीत चपराक दिली आहे. 
ऑडिट ब्युरो सक्र्युलेशनचा पुरावा देत पुढारीने आपल्या आजच्या अंकात 'आकडे 'खरे' बोलतात',ही जाहिरात प्रसिध्द केली आहे.'पुढारी' कोल्हापुरात कधीच होर्डिंग्ज लावत नाही.कोणी त्यांना खिजवले की,ते आपल्या पेपरमध्ये जाहिरात देवून उत्तर देत असतात.तसेच आजही पुढारीने केले.
जुलै ते डिसेंबर २०१४ चा ऑडिट ब्युरो सक्र्युलेशनचा त्यांनी पुरावा दिला आहे.त्यानुसार कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पुढारीचा खप १ लाख ७१ हजार ८०९ दाखवण्यात आला.क्रमांक दोनला सकाळ आहे.सकाळचा खप शहर आणि जिल्ह्यात ९५ हजार ४७८ आहे.लोकमतचा खप मात्र अत्यंत किरकोळ आहे.३० हजार ३३६ खप असताना,लोकमत आता कोल्हापुरात पुढारी अशी जाहिरात करण्यात आली.
http://epaper.pudhari.com/epapermain.aspx
वारे रे दर्डा शेठ...
उंटाचा मुका नका घेवू...
कोल्हापुरात पुढारी तर पुण्यात सकाळ नंबर १ आहे.
तुम्ही नागपुरात क्रमांक १ वर आहात...
औरंगाबादेत तुम्हाला दिव्य आणि सकाळ मोठी टक्कर देतोय...
उगी हात दाखवून
अवलक्षण  कशाला करता ?
अश्या चुकीच्या जाहिराती करून काय मिळवता ?
खरं तर 'पुढारी'नं अशी जाहिरात करायला हवी होती...

कोल्हापुरात 'पुढारी'च खरा 'पुढारी'
बाकी सर्व 'फेकमत'...
कोल्हापुरात लोकमतचे जनरल मँनेजर मकरंद देशमुख आणि कार्यकारी संपादक वसंत भोसले दर्डाशेठला अडचणीत आणणार...
दर्डाशेठ तुम्ही कोल्हापुरात सहा सहा महिने जात नाही,
त्यामुळे 'देशमुखी' थाट सुरू आहे आणि 'वसंत' काही फुलतच नाही...