पुण्याची रात्र, दोन जाम आणि भलतीच कामं! मंडळी, आज बेरक्या तुमच्यासाठी अशी एक भन्नाट 'क्राईम-थ्रिलर-कॉमेडी' घेऊन आलाय, जी ऐकून तुम्ही हसून हसून खुळे व्हाल. विषय आहे पुण्यातल्या तोतया पत्रकारांचा आणि त्यांच्या वसुली-सिंडिकेटचा, ज्यांना आपण प्रेमाने 'गँग्स ऑफ दांडेकर' म्हणूया!
🍻 सीन १: 'नालेसफाई' ते पत्रकारितेचा उमाळा
दोन भिडू, गळ्यात पत्रकारितेचा पट्टा (जो वास्तवात नालेसफाईचा असतो) आणि पोटात परदेशी मदिरा! 'झुम बराबर झुम' करत हे दोघे पुण्याच्या 'रेड लाईट एरिया'त पोहोचले. तिथे जाऊन आपली 'नालेसफाई' (समजनेवाले को इशारा काफी है!) उरकल्यावर गपगुमान घरी जाण्याऐवजी, यातल्या एकाच्या अंगात अचानक 'खरा पत्रकार' जागा झाला. इथूनच या स्टोरीचा खरा खेळ सुरू होतो!
📸 सीन २: खिडकीतलं स्टिंग आणि 'यथेच्छ धुलाई'
दारूच्या नशेत मोह आवरला नाही आणि या पठ्ठ्याने शेजारच्या खिडकीत डोकावून पाहिलं. आतमध्ये 'दो हंसो का जोडा' एकांत साजरा करत होता. मग काय, आपल्या या 'बूम-योद्ध्याने' खिशातला मोबाईल काढला आणि चक्क शूटिंग सुरू केलं! पण बॉस, पोटासाठी देहविक्री करणारी 'ती' काही कच्च्या गुरुची चेली नव्हती. कपडे सावरताना तिची करडी नजर या मोबाईलधारी 'मजनू'वर पडली. त्यानंतर काय झालं विचारू नका! तिने आपल्या सख्या-सोबत्यांना गोळा केलं आणि या 'पत्रकारा'ची अशी काही यथेच्छ बाम-धुलाई केली की, याचा 'बूम' आणि 'झूम' दोन्ही कायमचं बंद पडण्याची वेळ आली!
📞 सीन ३: चोरी वरून शिरजोरी!
मार खाऊन तोंड सुजल्यावर या मद्यधुंद पत्रकाराने थेट एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला फोन लावला! आणि ऑर्डर काय सोडली? म्हणे, "साहेब, मी स्टिंग ऑपरेशन करत होतो, तुम्ही तातडीने कारवाई करा, नाहीतर आम्हाला तुमच्या वारंवार बातम्या कराव्या लागतील!" (वा रे पठ्ठ्या, बेदम मार खाल्ला तरी माज काही कमी होईना!)
🔄 कहानी में ट्विस्ट: 'रिव्हर्स गेम' आणि वसुली गँगचे 'अॅव्हेंजर्स'
पण इथं गेम पलटला! आता त्या महिलेने आत्मसन्मानासाठी या 'नालेसफाई कामगारा'वरच चक्क विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. प्रकरण थेट 'सीपी' साहेबांपर्यंत गेलंय आणि त्यांनी ते चांगलंच मनावर घेतलंय.
आता या भामट्याला वाचवण्यासाठी वसुली गँगचे सगळे 'अॅव्हेंजर्स' मैदानात उतरलेत. सेटलमेंटसाठी कोण कोण धडपडतंय बघा:
कोल्हापुरी चॅनलच्या 'विनायका'चा उंदीर
बुधवार पेठेतील 'झिरो पोलीस'
'शाही'चा अप्पुराजा आणि मानबिंदूचा मिंदे
आणि 'डॉन'चा चॅनेल 18 नंबरकारी 'गरिबांचा सोमैय्या' ऊर्फ नागडा पोपट!
हे सगळे सीपी साहेबांना फोन करून "साहेब, दाम घ्या पण प्रकरण मिटवा" अशी गयावया करत आहेत. पण रात्र वैऱ्याची आहे, पुढे काय होईल कुणालाच माहित नाही!
👮♂️ खाकी स्पॉन्सर्ड रासलीला?
या सगळ्या प्रकाराला 'खाकी'चा आशीर्वाद आहे का? काही तारांकित अधिकारी आणि वसुलीभाईंमुळे या 'पाळीव पत्रकारांचा' सुळसुळाट झालाय. पुण्याला आरसा दाखवणारी 'वराहमुखी लेडीटर', तिच्या उच्छादाला 'वयभव' प्राप्त करून देणारा परमनंट क्राईम बीट मार्शल 'डोरेमॉन' आणि त्यांनी पोसलेली ही पिलावळ! लक्ष्मीदर्शन नाही झालं की हे कीर्तन-भजन किंवा एखादा पिंगळा गात बसतात.
बहुतांश झोनमधून येणारी मासिक पाकीटं तर सुरूच आहेत, पण यांची मजल थायलंड-सिंगापूर-गोवा ट्रिप आणि पबच्या पार्ट्यांपर्यंत गेली आहे. हे सगळं कमी होतं की काय म्हणून एका झोनवाल्याने या दलिंदरांना चक्क एका 'धुरंदर' पिक्चरची तिकीटं काढून दिली म्हणे! जे पोलीस अधिकारी पाकीट देत नाहीत, त्यांच्याच एरियातल्या अवैध धंद्यांवर हे फ्रंटपेजसह 'स्टिंग ऑपरेशन'च्या नावाखाली भुंकत सुटतात.
बेरक्याचा सवाल:
या 'गँग्स ऑफ दांडेकर'ला पाठीशी घालतंय कोण? लोकांची लफडी चव्हाट्यावर आणणाऱ्यांची ही 'रासलीला' खाकी वर्दी का दडवत आहे? विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना पोलिसांच्या हाताला कापरं का सुटतंय? त्या धंद्याशी प्रामाणिक असणाऱ्या अबला नारीला न्याय मिळणार का? आणि या मद्यधुंद सिंडिकेट गँग मेंबरवर साधा FIR होणार की नाही? हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे!
तुर्तास इतकेच... जय महाराष्ट्र!
📝 ताजा कलम (Postscript): > हा जो मार खाल्लेला 'नालेसफाई कामगार' आहे ना, तो पार्ट-टाईम पुण्याच्या आरसावालीच्या चिमणीचा 'ड्रायव्हर' म्हणूनही काम करतो. काल-परवाच या फुकट्या 'चिमणा-चिमणी'ने एका पबमध्ये फुकटची दारू पिऊन लय राडा केला होता म्हणे! (सगळीच लक्षणं दळिद्री!)
(क्रमशः)

0 टिप्पण्या