बेरक्या एक्सक्लुझिव्ह: 'गँग्स ऑफ दांडेकर' रासलीला - भाग २
पुणे शहरात सध्या पत्रकारिता, राजकारण आणि ‘भोंदूगिरी’चा असा भन्नाट कॉम्बो जमलाय की नेटफ्लिक्सलाही स्क्रिप्ट कमी पडेल! एका रणरागिणीने केलेल्या गंभीर आरोपांमुळे ‘ब्रेकिंग न्यूज’पेक्षा ‘बेकिंग बँक ’ जास्त गरम झाली आहे.
प्रकरण असं की, भोंदू अशोक खरात याचा पर्दाफाश केल्यानंतर काही ‘क्रिएटिव्ह’ पत्रकारांनी “रिव्हेंज इज बेस्ट सर्व्ह्ड विथ कॅमेरा” हा मंत्र जपत 'रूपानं देखणी सुपारी चिकणी'ने प्रायोजित लोणावळा पार्टीत 18 च्या मुख्य पत्रकाराकडे तब्बल २५ लाखांची ‘स्टोरी पॅकेज’ डील केल्याचा आरोप आहे.
योजनेनुसार, ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली पत्रकार आस्ते 'कदम' यांना थेट बुधवार पेठेतील ‘फील्ड व्हिजिट’वर पाठवण्यात आलं. गेले होते तिघे मार खाल्ला एकट्यानेच. दोन नवखे पत्रकार फरार. पण प्लॅनमध्ये ट्विस्ट आला… कॅमेरा चालू असताना ‘अॅक्शन’पेक्षा ‘रिऍक्शन’ जास्त मिळाली! संबंधित महिलेनेच ‘लाइव्ह डेमो’ देत आस्ते कदम यांना चांगलाच ‘रिव्ह्यू’ दिला.
यानंतर प्रकरण पोहोचलं थेट फरासखाना पोलीस ठाणे येथे. तक्रार, अर्ज, दबाव, फोन कॉल्स… सगळा ‘पॉलिटिकल थ्रिलर’ एकदम फुल ऑन! सीपी समोर हात जोडून घटनेची मीमांसा करताना कोल्हापुरी चॅनलच्या उंदराने थोडसं कुरतडलं, बुधवार पेठेतील झिरो पोलीसाने थोडसं समजावलं, पुन्हा दाखल करू नये यासाठी गरिबांचा सोमय्या आणि शाहीचा अप्पू राजा पडद्यामागे थर थर कापत उभे होते. आपलं तर नाव घेणार नाही ना अशी छातीत धडधड ९ नंबरचा 'ससा रे ससा कापूस जसा' अन् कोल्हापुरी चॅनलच्या तिरूपतीला घाम फुटला होता म्हणे.
दरम्यान, आरोप असा की २५ लाखांचा ‘फंड’ आधी 18 च्या मुख्य पत्रकाराकडे, आणि मग 'शाही'चा अप्पू राजा, गरिबांचा सोमय्या, मानबिंदूचा मिंदे ‘सब-डिस्ट्रिब्युशन मॉडेल’ने छोट्या पत्रकारांपर्यंत! म्हणजेच, “ब्रेकिंग न्यूज” आता “ब्रेकिंग बँक” झाली का? असा सवाल उपस्थित होतोय.
रणरागिणीच्या मामाच्या लॉजवर स्टिंग ऑपरेशनचा थरार रंगला. सीसीटीव्ही मध्ये सर्व काही झालं. मध्यधुंद मार खाल्लेल्याने रणरागिणीचे नाव घेतल्यावर मॅनेजर चपापला.. अन मग स्टोरीमध्ये ट्विस्ट आला.
रणरागिणी मुळातच वकील असली तरी पोलिसी खाक्या च्या तालमीत तयार झालेली, तिला 'रूपानं देखणी' चा डाव लक्षात आला. 'वय' आणि अनु'भव' असल्यामुळे नेमका 'म्होरक्या' कोण याचा सुगावा लागला. एका फेसबुक पोस्टमुळे सिंडिकेट गॅंग लीडर आणि मेंबरची हातभर फाटली. मग सकाळीच शरणागती, माफी नामा आणि गयावया सुरू झाली. सिंडिकेट गॅंग मधला अप्पू राजा 'फुटला' आणि त्याने उलटी केली. मग 'रूपा'नं देखणी 'सुपारी' चिकणी' गाण्यावर कोणी कोणी डान्स केला हे सांगून टाकलं. अशा रीतीने एक न वाजलेली 'सुपारी' फुटली.
सीपीकडे तक्रार दाखल झाली असून, सगळ्या झोन वाल्यांची झाडाझडती सुरू झाली. 'संभा हो हो', 'हिम्मत'वाला चित्रपटाच्या गाण्यावर डान्स सुरू झाला. बाजीराव मस्तानी चा 'पिंगळा' देखील प्रस्तुत झाला. “डिफेमेशन वेब सिरीजच्या स्क्रिप्टचा डायरेक्टर, हीरो, हीरोइन अन् व्हिलन कोण?” याचा शोध सुरू आहे.
पुणेकरांनो, आता बातम्या बघताना रिमोटसोबत पॉपकॉर्नही ठेवा… कारण इथे प्रत्येक ‘न्यूज’ मागे एक ‘मूव्ही’ चालू आहे!
पुण्यात सध्या दोनच गोष्टी ट्रेंडमध्ये आहेत. एक म्हणजे ट्रॅफिक, आणि दुसरी म्हणजे “खाकी अन् पॉलिटिकल स्पॉन्सर्ड रासलिला”! फरक इतकाच की ट्रॅफिक दिसतं, आणि ही रासलिला फक्त “सेटिंग” असलेल्यांनाच दिसते.
खाकीतील काही ‘तारांकित’ मंडळी आणि वसुलीभाईंच्या कृपेने पत्रकारितेचं नवं इकोसिस्टम तयार झालंय “पाळीव पत्रकार आणि त्यांच्या पिल्लांची फुललेली नर्सरी!” 'मीडियातली राखी सावंत' 'वराहमुखी' मॅच बातमी ब्रेक केली म्हणत चोराच्या उलट्या बोंबा मारत फिरतीय. फोन करून बिंदास गुन्हा दाखल करा म्हणतीय. तिची चिमणी मात्र आता गोत्यात येणार.
ताजा कलम : इलेक्ट्रॉनिक वाल्यांच्या नावाने बोट मोडणाऱ्या आणि नाके मुरडणाऱ्या प्रिंटवाले लय धुतल्या तांदळासारखे नाहीत. 'करून करून भागले आणि देवपूजेला लागले' अनेक सुपाऱ्या वाजवून आता या सुपारीची चर्चा करतायत. कोल्हापुरी दैनिकाचा चार्ल सोब्राजचा 'हॅपी एंडिंग नो फंडिंग मसाज' चा किस्सा काही महिन्यांपूर्वी गाजला होता. प्यारेलाल बॉटम पॅन्ट घालणारा सोब्राज सीपींना म्हणतो 'गुन्हा दाखल करू नका', वारे पट्ट्या विसरला का मसाज वालीचा रट्टा !
क्रमशः

0 टिप्पण्या