दैनिक "जनशक्ति"चे मुख्यालय आता पुण्यात !!

दैनिक 'जनशक्ति'चे मुख्यालय आणि संपादकीय कामकाजाचे मुख्यालय पुढील महिन्यापासून जळगावातून पुण्यात हलविले जाणार आहे. जळगावातील जुनी आवृत्ती व कार्यालय सुरुच राहील. पुण्यातील आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) कार्यालयही आहे तिथेच राहील. मात्र, लवकरच पुणे शहरात फर्गसन कॉलेजसमोर FC रोडवर पुणे कार्यालय कार्यान्वित होईल. जागेसंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर होताच पुणे आवृत्तीही सुरु केली जाईल. याशिवाय लवकरच पुणे-मुंबई हायवेला लागून वाशी (नवी मुंबई) येथे "जनशक्ति"चे कार्यालय सुरु होत आहे. त्यानंतर तेथून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड आवृत्ती सुरु केली जाईल. कार्यकारी संपादक विक्रांत पाटील हे यापुढे जळगावऐवजी पुणे आणि आकुर्डी कार्यालयात बसतील.
याशिवाय रायगडातील एका परंपरा असलेल्या दैनिकात अनेक वर्षे संपादक राहिलेल्या चळवळीतील, लढाऊ पत्रकाराशी "जनशक्ति"ची बोलणी सुरु आहेत. त्यांना सन्मानजनक पद बहाल करून पुणे व मुंबईसह महाराष्ट्रात "जनशक्ति"चा चेहरा म्हणून स्थान दिले जाईल. तेही पुणे तसेच नरिमन पॉईन्ट (मुंबई) कार्यालयात बसतील. दैनंदिन संपादकीय प्रत्यक्ष कामकाजात त्यांना फारसे गुंतवून ठेवू नये, असा व्यवस्थापनाचा आग्रह आहे. नवी मुंबई आणि रायगड या आवृत्त्या विकसित करण्याची जबाबदारी मात्र त्यांना दिली जाईल.
"जनशक्ति"चे मुंबईतील सुरुवातीपासूनचे ब्युरो चीफ नितीन सावंत हेही दुखण्यातून सावरल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू करणार आहेत.
जळगाव कार्यालयातील सोयम अस्वार हे पुणे कार्यालयात सीनीअर सबएडिटर म्हणून रुजू होत आहेत. याशिवाय योगेश चौधरी हे मुंबई-पुण्यात फोटोग्राफर असतील. आनंद सुरवाडे यांना 1 सप्टेंबरपासून जळगाव कार्यालयात सीनीअर सबएडिटर म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे.
पुण्यातील कामकाजास 1 सप्टेंबरपासून नव्याने जोमात सुरुवात केली जाणार आहे. पुण्यात तसेच नवी मुंबई आणि रायगड आवृत्तीत संपादकीय DTP स्टाफ, स्ट्रीन्जर आणि वार्ताहर म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी 7767012222 या मोबाईल क्रमांकावर SMS किंवा व्हॉटस-अप करावे. (कृपया कॉल करू नये) यापूर्वी अर्ज केलेल्यांनीही इच्छुक असल्यास संपर्क करावा.
पुणे तसेच जळगावातही जाहिरात, मार्केटिंग, वितरण स्टाफ तसेच टार्गेट ड्रिव्हन काम करू शकेल, अशा व्यवस्थापकाची आवश्यकता आहे. इच्छुकांनी संपर्क करावा.