फोकस नेशनल न्यूज़ चॅनेलवर 15 ऑगस्टपासुन महिला सबलीकरण आणि बेटी बचाओ या संकल्पनेला आणखी मजबूत करणारा 'अबके बरस मोहे बिटियाही दिजो'हा टीव्ही शो सुरु झाला आहे..या चॅनलच्या सोशल एंड जेंडर विभागाच्या संपादिका डॉ मीना शर्मा शोच्या होस्ट आहेत. शारिरिक व्यंगावर मात करत आईएएस ची परीक्षा टॉप करणाऱ्या इरा सिंघल पासून ते उंचच उंच आकाशातून अतीबर्फाळ अंटार्टिका खंडावर स्काय डाइव करणाऱ्या पुण्याच्या पदमश्री शीतल महाजन पर्यन्त साहसी महिलांचा अत्यंत साहसी सफ़र या शोमधुन दाखवला जात आहे..
मुळात नेशनल चॅनेलच्या रोजच्या बातम्यांच्या धबडग्यात आणि क्राइम आणि इतर सवंग शोच्या रांगेत फोकस न्यूज़चा हा शो खुपच सरस ठरतो आहे..टीआरपीचा कोणताही सोस न बाळगता या शोची निर्मिति चांगल्या समाजासाठी केली गेली आहे..किंबहुना अस म्हणता येईल की हा अत्यंत नविन प्रयोग आहे..पुरुषी मक्तेदारी मोडून काढत अनेक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांची ही यशोगाथा म्हणजेच 'अबके बरस मोहे बिटियाही दिजो' तांत्रिक गुणवत्ता सांभाळत नॉएडाच्या भव्यदिव्य स्टुडिओत या शो ची निर्मिति केलि जात आहे.
त्यासाठी देशभरातले फोकस न्यूज़ चे ब्यूरो अत्यंत मेहनतीने रिसर्च करुन अशा महिलांचा शोध घेत त्यांना समाजसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत..
त्यासाठी देशभरातले फोकस न्यूज़ चे ब्यूरो अत्यंत मेहनतीने रिसर्च करुन अशा महिलांचा शोध घेत त्यांना समाजसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत..
फोकस न्यूज़चे एसोसिएट एडिटर मनोज भोयर यांनीही या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या अशा खास महिलांचा इंटरव्यू घेतला आहे.ज्यात पुरुषी अस्तित्व असणाऱ्या लोकल ट्रेंनच्या चालकांमधे उठून दिसणारी एकमेव महिला लोकल ट्रेन ड्राईवर मुमताज शेख,डिटेक्टिव रजनी पंडित,पुण्याची स्काय डायवर पद्मश्री शीतल महाजन,दलित उद्योजक कल्पना सरोज,पासस्ट हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ रागिणी पारेख, आदी महिला सामिल आहेत..महाराष्ट्रात प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत आपल्या कर्तुत्वाची पताका दाही दिशेला फड़कविणाऱ्या अशा खुप महिला आहेत..त्यांचाही परिचय या चॅनेलवर पुढे केला जाणार आहे.इतकच नव्हे तर तरुण मुलामुलीसोबत या महिलांचा टॉक शो सुद्धा पाहायला मिळणार आहे...
केंद्रीय बाल आणि महिला विकास मंत्री मेनका गांधी यांनी जातीन 10 ऑगस्टच्या लॉन्चिंग कार्यक्रमात हजेरी लावून उपस्थित तरुण पीढ़ीशी संवाद साधला.त्यांच्या मंत्रालयान या कार्यक्रमाची खास दखल घेतली..
त्यासाठी बेरक्याच्या फोकस न्यूजला शुभेच्छा आणि अत्यंत प्रेरणादायी असा समाजपयोगी आणि इतर चॅनललाही मार्ग दाखविनारा कार्यक्रम सुरु केल्याबद्दल धन्यवाद..