पुण्यातही लोकमतची जाहिरातबाजी...

कोल्हापूरप्रमाणे लोकमतने पुण्यातही जोरदार जाहिराबाजी सुरू केली आहे.पुण्यात मोठमोठे होर्डिग्ज लावून एकनंबरचा दावा सुरू केलेला आहे.मात्र वास्तविक पाहता,पुण्यात सकाळ नंबर 1 वर आहे.सकाळच्या मानाने लोकमतचा अर्धा खपही नाही,परंतु जाहिरातबाजी करून लोकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पुण्यात अनेक पेपर आले आणि गेले,पण सकाळला कोणीही आजपर्यंत टक्कर देवू शकलेला नाही.सकाळ एकीकडे आणि पुढारी,लोकमत,महाराष्ट्र टाइम्स एकीकडे आहेत.लोकसत्ता संपला आहे.स्थानिक प्रभात आणि केसरी नावापुरते उरले आहेत.
लोकमतच्या जाहिरातीबाबत एका वाचकांनी लिहिलेली पोस्ट वाचा....
ही पोस्ट जशीच्या तशी कॉपी करण्यात आलेली आहे.
..................................
कोणतेही नविन प्रोडक्ट बाजारात येताना किव्वा एखाद्या प्रोडक्ट चा हरवालेला विश्वास परत जिंकण्यासाठी म्हणून जाहिरातीचा वापर केला जातो. जाहिराती करण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून नेहमीच न्यूज़ पेपर कडे पाहिले जाते, त्या साठी वेगवेगळ्या न्यूज़ पेपर चे वेगवेगळे दर पत्रकहि ठरलेले असतात. असेच एक नामांकित न्यूज़ पेपर ज्याचे 2लाख वाचक आहेत त्यांनी मागील काही दिवसा पासून विविध होर्डिंग वर आपली जाहिरात करायला सुरुवात केली आहे. तसे जाहिरात कोणीही, कुठेही, कधीही करू शकतात. पण स्वतः कड़े 2लाख वाचक असताना अश्या प्रकारे रस्त्या वरील होर्डिंग वर जाहिरात का बरे करावी लागत असेल? अश्या प्रकारे एखाद्या न्यूज़ पेपर ला होर्डिंग चा जाहिरातीसाठी वापर करावा लागत असेल तर त्यांच्यावर क्लाइंट ने कसा विश्वास ठेवावा आणि त्यांना जाहिराती का दयाव्यात? बर ही बातमी कशाचि बघितली तर ती होती बातमी मूल्यांची.
उदा. काही लोककांचा आवाज दाबता येत नाही, काहींच्या गळ्यात पट्टे घालता येत नाहीत. अरे पण याच कामासाठी तुम्ही न्यूज़ पेपर चालू केला आहे मग त्याची जाहिरात कसली करताय?
बर आता त्यांनी त्या जाहिराती मध्ये एक नंबर दिला आहे कुतुहला पोटी मी त्या वर मिस कॉल पण दिला. तर मला मेस्सेगे आला ''धन्यवाद
9********* क्रमांकावर व्हाट्स अप करून बना सिटीझन जर्नालिस्ट''.
(खोदा पहाड़ निकला चूहा)
म्हणजे काय तर आपणच बातमी यांना फुकटात द्यायची आणि आपणच पैसे देऊन ती वाचायची आणि त्या मागे ते जाहिराती मधून लाखो-करोडो रुपये कमवणार........ असो