चांगल्या समाजासाठीमध्ये धुसफुस सुरू

'माझ्या या प्रितीला बातम्यांची रित'च कळत नसल्यामुळं 'चांगल्या समाजा'साठी चॅनलला गळती सुरू झाली आहे.कोल्हापूरच्या रिपोर्टरने राजीनामा तोंडावर फेकून 'महाराष्ट्र टाइम्स' जॉईन केलाय,तर पुण्यातील दोन स्ट्रींजर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.मावळची एक महिला रिपोर्टरही या मॅडममुळं मेताकुटीस आल्या आहेत.
या तेलगू मॅडम तश्या कामात बाप आहेत.यांची मराठी मोडकी तोडकी आहे.( वास्तविक या मॅडम सिंधी आहेत,परंतु त्यांना सर्व तेलगू म्हणूनच  ओळखतात...) या अमराठी
मॅडम हैद्राबादी आण्णांच्या लाडक्या असल्यामुळं त्यांचा बालकी बाका होवू शकत नाही.त्यांना प्रतिस्पर्धी चॅनलपेक्षा आपल्याकडं लवकर ब्रेकिंग हवी असते.प्रतिस्पर्धी चॅनलला त्यांच्या चॅनलच्या अगोदर ब्रेकिंग सुरू झाली की या जाम भडकतात.डायरेक्ट त्या रिपोर्टरला पुरूषी शिव्या घालतात.मग काय बिचारे स्ट्रींजर गप्प गुमान ऐकूण घेतात.पण प्रतिस्पर्धी चॅनलपेक्षा अगोदर ब्रेकिंग दिली किंवा चांगली स्टोरी दिली तरी त्या कधी कौतुकाची थाप मारत नाहीत,त्यामुळं बिचारे रिपोर्टर तंग आलेत.
हे झाले रिपोर्टरच्या बाततीत.हेड ऑफीसमध्ये सध्या अनेक पदे रिक्त आहेत.चांगले लोक येण्यास तयार नाहीत.या तेलगू मॅडम,सहारातून आलेल्या मॅडम आणि ईटीव्हीतून आलेला 'वक्रतुंड' यांची चांगली गट्टी असल्यामुळं एक त्रिकुट तयार झाले असून या त्रिकुटाला अनेकजण वैतागलेत.
'वक्रतुंड'च्या विरोधात अनेक वर्षापासून 'क्राईम शो' पाहणा-या 'झोपडपट्टी बाबू'ने हैद्राबादी आण्णांकडे थेट तक्रार केली होती.तेव्हा आण्णांनी या वक्रतुंडांची चांगलीच पिसं काढली.वक्रतुंडाला घरच्याकडूनच 'कडू मोदक' मिळू लागल्यामुळं तोही रूष्ठ झालाय.त्यांन वागळेंच्या चॅनलकडे आपली सोंड वळवण्याचा प्रयत्न केला होता पण तिथं बसलेला नंदीनं त्याची सारी मनसुबे पार धुळीला मिळवली.मग काय वक्रतुड सध्या थंडगार झालाय.
असो,चांगल्या समाजासाठी सुरू झालेल्या या चॅनलमध्ये सध्या असंतोष धुमसत आहे.अनेकजण चांगल्या संधीच्या शोधात आहेत.त्यामुळंच या ठिकाणी सध्या खो - खो सुरू आहे.