सांगलीत रिपोर्टरला बारमालकाने बेदम चोपले

'महाराष्ट्राचा मानबिंदू' सोडून 'पद्मश्रीं'च्या पेपरमध्ये गेलेल्या एका रिपोर्टरला एका बारमालकाने बेदम चोपल्याची चर्चा सांगलीत चांगलीच रंगू लागली आहे.
हा रिपोर्टर एका बारमध्ये 'बस'ण्यास गेला होता.भरपूर तिर्थप्राशन केल्यानंतर त्याने बिलावरून गोंधळ सुरू केला.यावेळी बार मालकांवर दबाब आणण्यासाठी त्याने आपल्या खिशातील ओळखपत्र दाखवले,मग काय बार मालक आणखी संतापला.
बार मालकाने त्यांला एका खोलीत डांबून बेदम चोपले.दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या गुरूच्या सांगण्यावरून सुटका केली.
हा हा म्हणता,ही वार्ता पद्श्रीच्या कानावर गेली.त्यांनी जाब विचारला असता,हा रिपोर्टर बार मालकाकडे गेला आणि हातापाया पडून हा प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे लिहून घेतले.
पद्मश्रीने त्यांना मोठ्या मनाने माफ केले असले तरी सांगलीत मात्र त्यांची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.
बारमध्ये केव्हाही बसणाऱ्या या रिपोर्टरला आता माफ करावे की एक वेळ सुधारण्याची संधी द्यावी,आता तुम्हीच ठरवा...