कोरटकरांच्या सहभागाने पत्रकारांच्या भुवया उंचावल्या...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यात नागपूरचे पत्रकार प्रशांत कोरटकर हेही सहभागी झाले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात संपूर्ण देशातून मी ऐकमेव पत्रकार असल्याचा दावा कोरटकर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर केलाय.त्यामुळे राज्यासह देशातील सर्व मराठी पत्रकारांच्या भुवया सध्या उंचावल्यात.
कोरटकर हे सरकारी खर्चाने गेले की,स्वखर्चाने की मुख्यमंत्र्यांच्या खर्चाने गेले याचा तपशिल आणि उलघडा अजून तरी झाला नाही.तो खुलासा आता कोरटकर यांनीच करावा.जेणे करून शंका आणि कुशंका यांना पुर्णविराम मिळेल.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोबत कोणत्या पत्रकारांना न्यावे हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे.परंतु कोरटकर यांचीच निवड का,याबाबत सध्या नागपूरसह महाराष्ट्राच्या पत्रकारांत चांगलीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक वर्षे विरोधी पक्षात होते.तेव्हा त्यांना 'प्रमोट' करण्याचे काम नागपूरचे काही पत्रकार करत होते.त्यात कोरटकर हेही अग्रभागी होते.आता सत्ता आल्यानंतर त्याची परतफेड म्हणून मुख्यमंत्री नागपूरच्या पत्रकारांना अशी संधी देत आहेत.
अशी संधी घेणारे अनेक संधीसाधू आहेत,हा भाग वेगळा,परंतु सध्या कोरटकर यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या जवळ कसे आहोत,हे जे दाखवत आहेत ते अनेकांना खटकणारे आहे.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.


प्रशांत कोरटकर यांचा खुलासा...
hello as my one of friend send me as you write. that your full write but let me clear you first. I went japan by my own way no CM or any govt take my expences. and one more thing as journalist if you creatic govt then you have to give info that what our govt do for state of maharashtra so I went. and I have my own media house I am running my digital news so I have right. to go any were in india or world to cover my news. and as you write.it will harmful for CM. I didn't do such thing to malinse any ones image as vidarbha person I have proud on CM that why I have to do my work. thanks you so much