नवी दिल्ली - सोशल मिडिया आणि
न्यूज चॅनल्स यांच्यातील जीवघेण्या स्पर्धेमध्ये वाचक, प्रेक्षकवर्गापर्यंत खऱ्या
बातम्या पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि ते काम करण्याची सुवर्णसंधी प्रिंट
मिडियाकडे असल्याचे सूचना आणि प्रसारणमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले.
दर दोन मिनीटांत नवनवीन
बातम्या देण्याच्या स्पर्धेत अनेक पत्रकार हे कल्पनांवर आधारित खोट्या बातम्या
तयार करतात. अश्या भयानक शर्यतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी विविध
कल्पनांवर आधारित बातम्या रचण्यात येतात. त्यातच प्रच्येकवेळी एक बातमी विविध
प्रकारे सादर करण्यात येते या सगळ्यामध्ये मूळ बातमी पुसली जाऊन काहीतरी वेगळेच
जगासमोर येते. अरुण जेटली म्हणाले की, गंभीर पत्रकारिता ही काळाची गरज आहे.
न्यूज चॅनल्सवर टीका
करताना ते म्हणाले की, टीव्हीवर होणाऱ्या चर्चा जणूकाही राष्ट्रीय ठळक बातमी आहे
अशापद्धतीत प्रसारित केल्या जातात परंतु वास्तविकता काही अन्य असते. इलेक्ट्रोनिक
मिडियातील पत्रकारांना असे वाटते जे काही टीव्हीवर छान दिसते तीच बातमी आणि बाकी
सगळे व्यर्थ आहे पण ह्याच वृत्ती कुठेतरी अटकाव करणे जरुरीचे आहे आणि वास्तवावर
आधारित असलेल्या बातम्या देणे अपेक्षित आहे. आणि ते चांगले काम करायला प्रिंट
मिडियाला संधी आहे.