'जय महाराष्ट्र'मध्ये 'महाभारत' सुरू...

१ मे २०१३ रोजी सुरू झालेल्या 'जय महाराष्ट्र' न्यूज चॅनलमध्ये गेल्या अडीच वर्षात 'नवा भिडू' आला की नविन 'राजकारण' सुरू होते.तेच 'समिकरण' सध्या सुरू आहे.नविन तीन सेनापतींनी कामावर लक्ष केंद्रीय करण्याऐवजी राजकारण सुरू केले आहे,त्यामुळे कर्मचा-यांमध्ये अस्थिर ,अविश्वास आणि 'अप्रसन्न' वातावरण आहे आणि हे सर्व 'खरे' आहे.
जेव्हा चॅनल सुरू झाले तेव्हा मंदार फणसे,रवि आंबेकर आणि तुळशीदास भोईटे या त्रिकुटाने आपल्या मर्जीतील लोकांची भरती केली. ते एक वर्षाच्या आत एका पाठोपाठ एक चॅनल सोडून दुसरीकडे गेले,पण त्यांच्यामुळे या चॅनलमध्ये आले,त्यांची मोठी अडचण झाली.नविन आलेल्या शैलेश लांबे आणि आनंद गायकवाड यांनी चॅनलची पार वाट लावली.तसेच जे फणसे,आंबेकर,भोईटे यांचे समर्थक होते,त्यांचा मोठा छळ केला.त्यांच्यावर चॅनल सोडून जावे,अशी परिस्थिती निर्माण केली.पण जे धैर्याने आणि अपमान सहन करत राहिले,ते टिकले.
त्यानंतर विलास आठवले आले.आठवले यांनी चॅनलची घडी बसवण्याचा प्रयत्न सुरू केलेला असताना,राम कदम यांचे प्रकरण आठवलेंला चांगलेच महागात पडले.मालकांने त्यांच्या डोक्यावर एक नव्हे तीन सेनापती आणले.नविन आलेले मुख्य संपादक समीरण वाळवेकर,व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे आणि कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी चॅनलची सुधारणा करायची आहे,या नावाखाली काही माणसांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.एखादा माणूस अकार्यक्षम असेल तर भरती करताना कोणते निकष लावण्यात आले होते,हे एक कोडेच आहे.नविन माणूस आला की,जुनी माणसे अकार्यक्षम,निष्क्रिय वाटायला लागतात,पण मुळ प्रश्न हा 'इगो पाँईट' आहे.आपल्याला कोणी नमस्कार करत नाही,कोणी किंमत देत नाही,हा इगो असतो.मग आपल्या मर्जीतील लोकांना घेतले जाते.मग चॅनलची प्रगती होण्याऐवजी अधोगतीकडेच वाटचाल होते.
जुनी माणसे काढायची आणि नविन माणसे भरती करायची हा प्रयोग वारंवार होत असल्यामुळे 'जय महाराष्ट्र'ची घडीच निट बसत नाही.एक तर या चॅनलमध्ये कारभारी जास्त नेमले जातात आणि झोलू लोकांची संख्या जास्त असते.त्यामुळे या चॅनलमध्ये कामापेक्षा राजकारणच जास्त आहे.येथे कोणाचा कोणावर विश्वास नाही.चॅनलमध्ये टीमलीडर चांगला असायला हवा.तोच राजकारण करत असेल तर चॅनल खड्डयात गेले समजा.
एक तर या चॅनलचे वितरण अत्यंत गचाळ आहे.अनेक शहरात केबलवर हे चॅनल दिसत नाही.अनेक डिशवर हे चॅनल नाही.त्यामुळे कितीही सोन्याहून पिवळे केले तरी वितरण गचाळ असल्यामुळे टीआरपी वाढत नाही.मालक सुधाकर शेट्टी यांना चुकीची माहिती दिली जाते. सीईओ राजेश क्षीरसागर हातबल आहेत.
नविन मुख्य संपादकांना टीव्ही मार्केटमध्ये कोणी मोजत नव्हते.त्यांना अचानक मुख्य संपादकपदाची लॉटरी लागली. त्यामुळे त्यांना आकाश टेंगणे वाटत आहे.त्यांना टीम कशी हाताळावी याचे 'समीकरण' माहित नाही,त्यामुळे चॅनलमध्ये 'वाळवी' लागली आहे.प्रसन्न जोशी यांना डिबेट शोचा चांगला अनुभव असला तरी,टीम लीडर म्हणून काम करण्याचा अनुभव नाही.व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे यांनी आजपर्यंत रिपोर्टर म्हणूनच काम केलेले आहे.त्यामुळे त्यांचीही तिच बोंब आहे.या चॅनलमध्ये सर्व सेनापती आहेत.नविन तीन सेनापती जुने सेनापती चॅनल कसे सोडून जातील,याबाबत रोज 'चक्रव्यूह' आखत आहेत.आठवलेंचा 'अभिमन्यु' करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.मालक 'ध्रुतराष्ट्र' झालेत आणि कर्मचारी सैरभैर झालेत.त्यामुळे जय महाराष्ट्रमध्ये कामापेक्षा 'महाभारत' सुरू आहे आणि सर्व वातावरण 'अप्रसन्न' झाले आहे.