निखिल वागळेंच्या चॅनलमध्ये सत्यनारायणाची महापुजा...

मुंबई - निखिल वागळे आणि त्यांची कलमनामा करणारी मंडळी म्हणजे पुरोगामी विचारसरणीचा टेंभा मिरवणारी...पण त्यांच्याच चॅनलमध्ये काही दिवसांपुर्वी सत्यनारायणाची महापुजा करण्यात आली होती,हे ऐकूण तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्का बसेल.होय पण विश्वास ठेवा अथवा न ठेवा,पण ही बातमी शंभर टक्के खरी आहे.
निखिल वागळे यांंचे महाराष्ट्र १ चॅनलचे मुख्य कार्यालय आणि स्टुडिओ लोअर परेलमध्ये सिताराम मिल कंपाऊंडमध्ये आहे.याच ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आणि आता काही सलेक्ट मंडळींना ट्रेंनिंगही देण्यात येत आहे.१४ तारखेला ट्रेनिंग सुरू करण्यात आले आणि १५ तारखेला सत्यनारायणाची महापुजा करण्यात आली.ही महापुजा भटजी लावून मंत्रतंत्र म्हणून करण्यात आली आणि सर्व ट्रेंनिंग करणा-यांना प्रसाद देण्यात आला.
आता तुम्ही म्हणाल,हे कसे शक्य आहे.वागळे आणि कलमनामा करणारी मंडळी तर पुरोगामी वगैरे वगैरे आहे...ते देव मानणा-या आणि कर्मकांड करणा-यांना शिव्या घालतात...हे शक्य आहे काय ?,बेरक्याला वेड लागलय असे म्हणाल.
पण मंडळी बिचारे वागळे तर काय करणार ? चॅनलला फायनान्स करणारी मंडळी देव भक्त आहेत.त्यांचा देवावर विश्वास आहे.कर्मकांडावर विश्वास आहे.त्यांनीच ही सत्यनारायणाची पुजा केली होती.
वागळेंना आपल्याच चॅनलमध्ये सत्यनारायण महापुजा घालण्यात आल्याचे कळताच,ते त्या दिवशी स्टुडिओकडे फिरकले नाहीत.कलमनामा करणारी मंडळी फक्त पहात होती,पण करणार काय ?दोन - तीन दिवसांनंतर वागळेंनी पुन्हा चॅनलच्या स्टुडिओमध्ये येण्यास सुरूवात केलेली आहे.परंतु आता पुलाखालून पाणी गेल्याने तेही गप्प आहेत.
आता तुम्हीच सांगा,महाराष्ट्र 1चॅनलमध्ये आता वागळे मोठे की त्यांना फायनान्स करणारे मोठे ? भाऊ शेवटी फायनान्स करणारेच मोठे ना ?
अहो भटजी,अहो भटजी म्हणून हिणवणा-या वागळेंच्या स्टुडिओमध्ये भटजींच्या हस्ते सत्यनारायणाची पुजा झाली,हे वागळेंना चांगलेच खटकले असेल,पण करतात काय ?
ऐवढेच काय, वागळे हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला नेहमी शिव्या घालतात,पण संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात महाराष्ट्र १ चॅनलचा रिपोर्टर कट्टर संघ कार्यकर्ता असेल,हे ऐकूण आणखी एक आश्चर्याचा धक्का बसेल.होय तेथे संघामध्ये उठबस असणा-या अमरची निवड केली जातेय.
आता बोला,आहे की नाही गंमत...
यालाच म्हणतात,खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे...