काही महिन्यांपासून कोल्हापुरातील पत्रकारांची पाकीट संस्कृती
ते पत्रकार परिषदेतील फुकटच्या दारू व जेवणावर ताव मारणाऱ्या पत्रकार आणि
वरिष्ठांच्या विविध प्रकरणांचा बेरक्याने पोलखोल केल्यावर अनेकांनी ताकही
फुकुन प्यायला सुरवात केली होती.....पण अवघ्या काही दिवसाच इथल्या
पत्रकारांनी पुन्हा "ये रे माझ्या मागल्या" या उक्ति प्रमाणे आपले फुकटचे
रंग रूप दाखवायला सुरवात केली आहे.
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर "ईश्वराचे" रूप समजणाऱ्या कोल्हापुरातील एका
माजी नगरसेवकाने खास पत्रकारांसाठी मांसाहारी जेवणासह ओल्या पार्टीची सोय
केली होती. या माजी नगरसेवकाचा कोल्हापुरातील गुजरी परिसरात एक फ्लॅट आहे.
या ठिकाणी या ख़ास ओल्या पार्टीची मेजवानी देण्यात आली होती. यावेळी
कोल्हापुरचे बहुतांश सर्वच लाचार पत्रकार आणि संपादकांनी या पार्टीला हजेरी
लावली होती. तर अनेकजन सुट्टीवर असतानाही फुकटचे खायला - प्यायला मिळते
म्हंटल्यावर आवर्जून उपस्थित होते. येत्या महापालिका निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर पत्रकारांना खुश ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या या पार्टीची
चर्चा मात्र सगळीकडे होत आहे.