महाराष्ट्रनामा ( Date 11 Sep.)

नव जागृती न्यूज चॅनल अपडेट
..........................................
नव जागृतीच्या मालकांविरूध्द पुण्याच्या येरवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे.या तक्रारीवरून पोलीसांनी संचालक सलीम खंडायत,अकाऊंट माणिक शिंदे आणि मालकाचा भाऊ भास्कर गायकवाड यांस बोलावून घेतले होते.तेव्हा तिघांची पाचावर धारण बसली होती.सलिम खंडायत यांनी येत्या बुधवारपर्यंत सर्व कर्मचारी आणि स्ट्रींन्जरचा पेमेंट देण्याचे लेखी लिहून दिल्यानंतर त्यांना तुर्त सोडून देण्यात आले.
आता मालक राज गायकवाड यांनी नव जागृतीची मशिनरी विक्रीस काढली आहे.सोमवारी त्याचा लिलाव असल्याचे कळते.
बुधवारी पेमेंट न दिल्यास राज गायकवाडसह त्याची पत्नी,भाऊ आणि सलिम,माणिक आणि एच.आर.गजाआड होण्याची शक्यता आहे.



 कोल्हापूर - बेळगाव तरूण भारतच्या निवासी संपादकपदी जयसिंग पाटील (पुढारी) तर पुण्यनगरीच्या कार्यकारी संपादकपदी सांगलीचे अशोक घोरपडे...
....................

मंत्रालयात आज झालेल्या मुंबई विभागीय अधीस्वीकृती समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी चे संपादक संजय मलमे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांना धर्मेंद्र जोरे, संजीव शिवडेकर ,प्रवीण पुरो , सचिन परब या सदस्यांचे समर्थन लाभले. चौघांनी सामुहिकपणे बिनविरोध निवडण्याचा प्रस्ताव ठेवला .त्यांचे पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले ...
...............
सोलापूर - दैनिक सकाळचे सहयोगी संपादक दयानंद माने यांची औरंगाबादला बदली...
अभय दिवाणजी नवे सहयोगी संपादक..
दयानंद माने औरंगाबादेत बसून उस्मानाबाद,लातूर आवृत्तीचे काम पाहणार...


 ........

 नवी दिल्ली - एबीपी माझाला गळती सुरूच...बेरक्याचे भाकीत खरे ठरले...कौस्तुभ फलटणकर यांचा अखेर एबीपी माझाला रामराम...

 ...............

सोलापूर - दैनिक लोकमतचे संपादक राजा माने यांची पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
..............
कोल्हापूर - चंद्रशेखर माताडे पुन्हा पुढारीमध्ये जॉईन..
.......... 


आयबीएन - लोकमतचे तीन प्रतिनिधी महाराष्ट्र 1 ला गेले होते,आता या रिक्त जागेवर नियुक्त झालेले प्रतिनिधी असे...
नवी दिल्ली - कौस्तुभ फलटणकर
पुर्वीचे प्रतिनिधी - अमेय तिरोडकर

पुणे - वैभव सोनावणे
पुर्वीची रिपोर्टर - प्राची कुलकर्णी

नाशिक - प्रशांत बाग
पुर्वीची रिपोर्टर - दीप्ती राऊत

.............


अहो आश्चर्यम् ...
महाराष्ट्राच्या मानबिंदूने औरंगाबादला दुष्काळी संपादक नियुक्त करताच,
मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस....
आता जानेवारीपर्यंत दुष्काळी संपादकांना काम नाही...
अखेर वरूणराजाचा लोकांना 'दिलासा'...
शेठजीचा दुष्काळी संपादकांवरील 'दिलासा' मागे...