'प्रहार' मध्ये सावळा गोंधळ

'प्रहार'चे मालक बाहेर कितीही राजकारणी आवेशात सर्वसामान्यांची बाजु घेत असल्याचे भासवत असले तरी , त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या 'प्रहार'मध्ये अतिशय सावळा गोंधळ चाललेला आहे. व्यवस्थापनात कसलाही ताळमेळ नाही, नविन भरती केलेल्या पत्रकाराला संपादक पगार ठरवतात, काही दिवस काम करुन झाले की एच.आर.म्हणतो की संपादकांनी ठरवलेला पगार आम्ही देत नाही, तुम्हाला आम्ही सांगु त्या पगारात काम करावे लागेल. अशा प्रकारे अड़वणूक केली जाते. नाईलाजास्तव त्या व्यक्तीला काम करावेच लागते . ऑफिसमध्ये दिवसाआड नितेश राणे येतात हवा करुन जातात पण पत्रकारांची काय गळचेपी होत आहे, याकडे तेही लक्ष देत नाहीत.पगारवाढ होत नाही म्हणुन अनेकजण वैतागले आहेत, काही जण प्रहार सोडण्याच्या तयारीत आहेत.नविन माणसाला कोणतेही नेमणूक पत्र दिले जात नाही व पगारही बँकेत न देता रोख किंवा डीडी दिला जातो ,कोणी इन्स्पेक्षनला आले तर अडचण व्हायला नको म्हणुन असे केले जाते.
प्रहारचा आणखी एक गोंधळ म्हणजे महिन्याची पंधरा तारीख उलटुन जाते तरी लोकांचे पगार होत नाहीत. ९ ऑक्टोबर रोजी प्रहारचा सातवा वर्धापन दिन जोरात साजरा होणार आहे. यात मालकापासून, संपादक ते व्यवस्थापकांपर्यंत मोठमोठ्या गप्पा मारतील पण प्रहारच्या आत काय डाळ करपत आहे याकडे लक्ष दिले तरच योग्य होईल नाहीतर प्रहारची नौका वादळात सापडली म्हणून समजा... 


जाता जाता : शेट्टी आण्णांच्या थेट,अचूक आणि बिनधास्त चॅनलमधील अनेक स्ट्रींन्जर रिपोर्टरना गेल्या सहा महिन्यापासून मानधन मिळालेले नाही.नविन त्रिकूट आल्यानंतर आता तरी मानधन वेळेवर मिळेल,अशी अपेक्षा होती,परंतु ही अपेक्षा फोल ठरली आहे.