मुंबई - सुमारे 700 कोटी रुपयांहून अधिक रकमेची काळी माया जमवणार्या महेश मोतेवार
यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश थेट केंद्र सरकारने सीबीआयला
दिल्यामुळे मोतेवारांना आता तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. यामुळे
धास्तावलेल्या मी मराठीच्या सीईओ सुप्रिया कणसे यांनी त्यांच्या पदाचा
नुकताच राजीनामा दिला आहे. सुप्रिया या मोतेवार याच्या 'खास' मर्जीतल्या
मानल्या जातात.
महेश मोतेवार यांच्या समृद्ध जीवन फुड्स लिमिटेडविरोधात सेबीने फौजदारी तक्रार दाखल केल्यानंतर जेमतेम एक आठवडा पूर्ण होण्यापूर्वीच ब्रॉडकास्ट इनिशिएटीव लिमिटेड कंपनीच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी सुप्रिया कणसे यांनी पदाचा राजीनामा दिला. या दोन घटनांमधील कार्यकारणभावाचा पोलिस आणि राज्य सरकारने गंभीरपणे विचार केला पाहिजे.
२०१३ साली सेबीने समृद्ध जीवनवर ठेवी घेण्यास बंदी घातली होती. त्यानंतर शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी या कंपनीने स्वीकारल्या आणि सेबीच्या आदेशाचे उघड उल्लंघन केले. हे पैसे आता समृद्ध जीवन कंपनी परत कशी करणार हा यक्षप्रश्न आहे. मोतेवार आणि अन्य संचालकांना पोलिस तक्रारीत आरोपी करण्यात आले आहे. गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्यास या सर्वांना अटक केली जाईल. महाराष्ट्र गुंतवणूकदार व ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार या सर्व आरोपींच्या व्यक्तिगत मालमत्तेवर टाच येऊ शकते.
मी मराठी ही वाहिनी चालविणाऱ्या ब्रॉडकास्ट इनिशिएटीव लिमिटेड कंपनीत झालेली प्रचंड गुंतवणूक समृद्ध जीवन या कंपनीने केल्यामुळे महेश मोतेवार हे या कंपनीचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यांच्या मर्जीतील सुप्रिया कणसे, कुमार केतकर, शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत, अविनाश गोडसे इत्यादींना ब्रॉडकास्ट इनिशिएटीव लिमिटेडची संचालक पदे बहाल करण्यात आली होती. महाराष्ट्र गुंतवणूकदार व ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार 'समृद्ध जीवन फुड्स लिमिटेड'विरोधात आरोपपत्र दाखल झाल्यास 'ब्रॉडकास्ट इनिशिएटीव लिमिटेड कंपनी'ची चौकशी होणार हे निश्चित आहे. आज ही कंपनी तोट्यात चालते आहे. तिचे समभाग मूल्यही कोसळले आहे. वित्तसंस्थांकडून सहाय्य नसल्याने 'समृद्ध जीवन' या कंपनीने जर या कंपनीस कर्जे दिली असतील तर त्या कर्जांची परतफेड करण्याची जबाबदारी 'ब्रॉडकास्ट इनिशिएटीव लिमिटेड कंपनी'च्या संचालकांवर येऊन पडणार हे निश्चित.
एरव्ही एखादी कंपनी तोट्यात गेल्यास किंवा बुडाल्यास संचालक जबाबदार नसतात, मात्र महाराष्ट्र गुंतवणूकदार व ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार समृद्ध जीवन फुड्स आणि मोतेवार यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ब्रॉडकास्ट इनिशिएटीव लिमिटेडवरही त्याच कायद्यानुसार कारवाई होईल आणि या कंपनीत समृद्ध जीवन फुड्सने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने गुंतवलेली रक्कम परत न दिल्यास ब्रॉडकास्ट इनिशिएटीव लिमिटेडच्या संचालकांची मालमत्ता जप्त होऊ शकते.
ब्रॉडकास्ट इनिशिएटीव लिमिटेडच्या संचालकांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाईही लवकरात लवकर व्हावी आणि इतर संचालक राजीनामे देऊन निसटून जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, अशी मागणी हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर यांनी सरकारकडे केली आहे. या प्रकरणात गुंतवणूकदारांना विनामुल्य सल्ला दिला जाईल आणि वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती पुनाळेकर यांनी दिली आहे.
कोण आहेत सुप्रिया कणसे ?
महेश मोतेवार यांनी 2002 याली पुण्यामध्ये समृद्धी जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी सुप्रिया कणसे या कारकून म्हणून कामाला लागल्या. त्यानंतर त्यांचे महेश मोतेवार यांच्याशी 'सूत' जुळले, व मोतेवारांनी त्यांची थेट कंपनीच्या जनरल मॅनेजरपदी नियुक्ती केली.
दरम्यान मोतेवार यांची सुप्रियाशी असलेली ही 'जवळीक' त्यांची दुसरी पत्नी लीना मोतेवार यांना खटकली व त्यातूनच लीना यांनी सुप्रियाला ठार मारण्यासाठी तब्बल 5 लाखांची 'सुपारी' दिली. त्यानुसार 19 डिसेंबर 2009 रोजी 5 मारेकर्यांनी पुण्यातील एफ. सी. रोडवरील कंपनीच्या पार्किंग परिसरात धारधार हत्यारांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या हात व डोक्याला जबर मार लागला. या हल्ल्यादरम्यान सुप्रिया यांचा तत्कालीन ड्रायव्हर राजू बिरादार याने हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हे हल्लेखोर तात्काळ टू-व्हीलरवरून पसार झाले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तेथील लोकांनी सुप्रिया यांना संचेती हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केले. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
तत्कालीन डेप्यूटी कमिशनर (पोलिस) ज्ञानेश्वर फडतरे व त्यांच्या टीमने मोठ्या धाडसाने या हल्ल्यातील पाच मारेकर्यांना (लीना यांचा तत्कालीन ड्रायव्हर वाघेश्वर प्रल्हाद मते यासह) ताब्यात घेतले. या मारेकर्यांच्या कबुलीजबाबात हा हल्ला करण्यासाठी लीना मोतेवार यांनी सुपारी दिल्याचे आरोपींनी सांगितले.
मोतेवार हे सुप्रियाशी 27 डिसेंबर 2009 रोजी लग्न करणार होते. या विवाहबाह्य संबंधांमुळे दुखावलेल्या लीना यांनी हा हल्ला आपण स्वतःच 'सुपारी' देवून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी लीना यांना सुप्रियाचा खून करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटकही केली होती.
त्यावेळी सुप्रियाचे वय होते अवघे 25 वर्षे. त्यानंतर मात्र सुप्रिया कणसे यांच्या प्रगतीचा आलेख हा कायमच उंचावर राहिला. त्यांना नंतर 'मी मराठी', 'मी मराठी लाईव्ह'च्या सीईओपदी नियुक्त करण्यात आले. त्यामुळे त्यांचा रुबाब अधिकच वाढला. उठसुठ जगाला पत्रकारिता, सेक्युलरतेचे धडे देणारे तथाकथित दिग्गज ज्येष्ठ संपादक, पत्रकार या सुप्रियाचे तळवे चाटू लागले .

सुप्रियांचा राजीनामा मात्र क्रिमिनल लायबिलीटीतून मुक्तता नाही
ब्रॉडकास्ट इनिशिएटीव्ह लिमिटेड ही कंपनी मोतेवार यांच्या मालकीची आहे.
मोतेवार यांनी श्री अधिकारी ब्रदर्स न्यूज अॅण्ड टेलिव्हिजन नेटवर्क
लिमिटेड या कंपनीकडून मी मराठी हे चॅनेल 2008 साली विकत घेतले, तर मी मराठी
लाईव्ह हे मराठी वृत्तपत्र 27 फेब्रुवारी 2015 रोजी चालू केले.
या प्रसारमाध्यमांसाठी भरभक्कम पैसा हवा होता. मोतेवार यांनी
गुंतवणूकदारांना चुना लावून जमवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशातून
हा पैसा उभा केला.
या प्रसारमाध्यमांतून सरकार दरबारी अंकुश (दबाव) रहावा व गुंतवणूकदारांची
कायमच फसवणूक करत रहावी, या उद्देशाने कुमार केतकर, निखील वागळे, शिवसेनेचे
माजी खासदार भारतकुमार राऊत यांसारख्या मराठीतील तथाकथित मातब्बर
पत्रकारांची फौज मोतेवर यांनी कामाला ठेवली.
या वर्तुळाकार व्यवहारांना सांभाळण्यासाठी त्यांनी त्यांच्या 'खास'
मर्जीतील सुप्रिया कणसे यांची नियुक्ती केली. मात्र जसजशी प्रकरणे अंगलट
येवू लागली, तसतशी सुप्रिया कणसे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. अखेर 5
नोव्हेंबरला त्यांनी या कंपनीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मात्र
तरीही त्यांची क्रिमिनल लायबिलीटीतून मुक्तता होवू शकत नाही, असा दावा
ज्येष्ठ वकिलांनी केला आहे.
---------------------------------------------------
भुरटे मंत्री व सोन्याचे नाणे
'महेश मोतेवार मराठीच पण 420' या मथळयाखाली 'मुंबई मित्र'ने २१ आक्टोबर
रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे मोतेवार व त्यांच्या बागडबिल्ल्यांची एकच
तारांबळ उडाली. 'मी मराठी' चालूच राहणार' असल्याचे सांगत त्यांनी भाजपशी
सलगी वाढवण्याचा प्रयत्न आणखी तीव्र केला.
यासाठी त्यांनी भाजपच्या मंत्र्यांना 'मी मराठी' व 'मी मराठी' लाईव्ह'च्या
ऑफिसमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठीसाठी आमंत्रण पाठवले. या भेटीला येणार्या
मंत्र्यांना एक सोन्याचे खणखणीत नाणे देण्याचे कबूल केले असल्याची माहिती
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निलेश मंगळे यांनी दिली. यानुसार महसूलमंत्री
एकनाथ खडसे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरीत हजेरी लावली व
मोतेवारांच्या त्या 'प्रेमाच्या भेटी'चा स्वीकार केल्याची माहिती सामाजिक
कार्यकर्ते दिलीप इनकर यांनी दिली.
------------------------------------------------------
'समृद्ध जीवन'सह संचालक महेश मोतेवारांवर गुन्हा दाखल
सेबीने निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी
'समृद्ध जीवन फूड्स' कंपनीसह महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध 1 नोव्हेंबर
रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सेबीने शनिवारी ३१ ऑक्टोबरला
सायंकाळी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, या गुन्ह्यात
त्यांच्या सहकार्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. महेश किसन मोतेवार,
वैशाली महेश मोतेवार, घनश्याम पटेल आणि राजेंद्र भंडारे यांच्यासह 'समृद्ध
जीवन फूड्स' कंपनीविरुद्ध भादंवि 420, 188, 120 ब नुसार गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. याप्रकरणी सेबीचे सहायक महाव्यवस्थापक सचिन ए. सोनवणे
यांनी तक्रार केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2013 रोजी सेबीने कंपनीला
गुंतवणूक न घेण्याबाबत नोटीस बजावली होती. कंपनीमार्फत 'कलेक्टिव्ह
इन्व्हेस्टमेंट स्कीमद्वारे' लोकांकडून आर्थिक गुंतवणूक तसेच ठेवी घेण्यात
येत होत्या़ अशा प्रकारची गुंतवणूक घेण्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक
असते. ही परवानगी समृद्ध जीवनने घेतलेली नव्हती. त्यामुळे गुंतवणूक
थांबविण्याचे आदेश सेबीने दिले होते. परंतु, तरीही कंपनीने गुंतवणूक घेणे
सुरूच ठेवले होते. त्यामुळे सेबीने कंपनीची चौकशी सुरू केली. याआधी सेबीने
समृद्ध जीवनला गुंतवणूकदारांची रक्कम तीन महिन्यात परत करण्याचे आदेशही
दिले होते. मात्र, सेबीचे कोणतेही आदेश न पाळता समृद्ध जीवनने मनमानी
कारभार चालूच ठेवला आहे.
------------------------------------------------------
शेंबुड आपल्या नाकाला !
उठसुठ हिंदुत्त्वाच्या नावाने खाकरणार्या कुमार केतकरांनी आयुष्यभर सोनीया गांधींची चाकरी केली. आता ते मोतेवारांची धुणी धूत आहेत. मोतेवारांना लाखो जनतेचे तळतळाट लागत आहेत. या पापात केतकरही सामील आहेत. त्यांनाही मोतेवारांप्रमाणे तुरूंगाची हवा खावी लागणार आहे.
अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर,अध्यक्ष, हिंदू विधीज्ञ परिषद
-------------------------------------------------------
मोतेवार यांनी लोकांचा लुटलेला पैसा हा त्यांनी त्यांच्या 'मी मराठी' या
चॅनल व 'मी मराठी लाईव्ह' या वृत्तपत्रात गुंतवला आहे. अशा प्रकारच्या
लुटलेल्या पैशातून त्यांनी संबंधित कर्मचार्यांना दिलेला पगारही सरकार
त्यांच्या अकाऊन्टमधून कधीही जप्त करू शकते. भारतीय दंड संविधान 120 ब
अन्वये षडयंत्र रचणारा व त्याला सहकार्य करणारा तितकाच दोषी आहे. यामुळे जी
शिक्षा 420 मोतेवारांना मिळेल तीच शिक्षा सरकारने या संपादक, संचालक यांना
द्यावी, अशी मागणीही हिंदू विधीज्ञ परिषदेचे अॅड. संजीव पुनाळेकर यांनी
केली आहे.
....................................................................................
लाखो गोरगरिब गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा चुना लावणार्या 420 महेश मोतेवार यांची सखोल चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉजिटर्स अॅक्ट (एमपीआयडी) लागू करण्यात यावा. जनतेच्या लुबाडलेल्या पैशातून जर 'मी मराठी' चॅनल व 'मी मराठी लाईव्ह' हे वृत्तपत्र विकत घेऊन चालवले जात असेल तर सरकारने या प्रसारमाध्यमांवर जप्ती आणली पाहिजे. इतकेच नव्हे तर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर मोक्काची कारवाई केली गेली पाहिजे.
अॅड. संजीव पुनाळेकर सचिव, हिंदू विधिज्ञ परिषद
याबाबत प्रतिक्रियेसाठी महेश मोतेवर, मोतेवार यांच्या द्वितीय पत्नी लीना,
सुप्रिया कणसे, कुमार केतकर यांना संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.
- उन्मेष गुजराथी