नवी दिल्ली - प्रसिद्ध टीव्ही जर्नलिस्ट बरखा दत्त देखिल
लैंगिक शोषणाच्या शिकार ठरल्या होत्या. बरखा यांच्या बुधवारी प्रकाशित
झालेल्या ‘This Unquiet Land - Stories from India's Fault Lines’ या
पुस्तकात याचा उल्लेख आहे.
काय म्हटले बरखा यांनी
बरखा दत्त लिहितात - मी 10 वर्षांची देखिल नव्हते, जेव्हा माझे लैगिक शोषण झाले. हे कृत्य करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून माझा दुरचा मामा की काका होता. तो आमच्या घरात राहायला आला होता. इतर पंजाबी कुटुंबाप्रमाणेच आमच्याघराचे दरवाजेही नातेवाईकांसाठी नेहमी उघडे असायचे. आज मला त्या नातेवाईकासोबत आमचे नाते नेमके काय होते ते आठवत नाही. मात्र एका लहानग्याच्या नजरेत तो लाडका मामा किंवा काका होता.
बरखा लिहितात, 'मी फक्त एवढाच विचार करते की ज्या व्यक्तीच्या
अंगा-खांद्यावर तुम्ही खेळत असता, ती एवढी राक्षसी असू शकते ? बालपणी आपण
समजू शकत नाही आपल्यासोबत काय होत आहे ? मात्र मी त्या चेहऱ्यामागील
घाणेरड्या विचाराच्या माणसाला ओळखू शकले नाही. आजही आम्ही आमच्या मुलांना
'गुड आणि बॅड टच' याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजवू शकलेलो नाही.
सुरुवातीच्या काही दिवसानंतर मी त्या व्यक्तीच्या रुममध्ये खेळायला जाऊ
लागले होते. '
- त्या लिहितात, 'गिल्ट आणि भय यांना दूर सारत एक दिवस मी माझ्यासोबत
होणाऱ्या गोष्टी आईला सांगितल्या. त्यानंतर त्या नातेवाईकाला तातडीने
घराबाहेर काढण्यात आले. मी देखिल पुढील आयुष्यात अशा कटू घटनांचा सामना
करावा लागणार नाही अशी आशा करत त्या कटू आठवणींना दफन करण्याचा प्रयत्न
केला.'
तो घाणेरडा वास आजही माझ्या डोक्यातून जात नाही
- 'काळाबरोबर मी मोठी होत गेले, मात्र ती व्यक्ती केसांना जे तेल वापरत होती त्याच उग्र दर्प आजही शीरशिरी आणतो. आजही त्या तेलाचा दर्प आला तर असे आटते की मला भोवळ येईल. मोठे होत असताना मी त्या व्यक्तीचा चेहरा आणि नावही माझ्या स्मृतीपटलावून पुसून टाकले. आता मी ती घटना विसरले होते, मात्र जेव्हा त्या घटनेच्या कटू आठवणी जाग्या होतात तेव्हा वाटते की लैंगिक शोषण मागे एक उग्र दर्प ठेवून जाते.'
- 'बालपणी घडलेली ही एकमेव घटना भयावह सावलीसारखी मी मोठी
झाल्यानंतरही माझ्या मागे चालत होती. बालपणी घडलेली त्या घटनेची भीती
माझ्या मनात असे काही घर करुन बसली होती की मी मोठी झाल्यानंतरही काही घडले
तरी घाबरत होते. हे भय त्यांच्या मनात असते, ज्यांच्यासोबत बालपणी अशा
प्रकारच्या घटना घडलेल्या असतात.'
53 टक्के मुले कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लैंगिक शोषणाचे शिकार झालेले असतात
- बरखा त्यांच्या पुस्तकात लिहितात, 'मला तेव्हा समजले नाही, पण माझ्यासोबत जे झाले ते भयावह होते. पण ते अनकॉमन आहे, असेही नाही. 2007 मध्ये सरकारने लहान मुलांसोबत झालेल्या लैंगिक शोषणाची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यातून समोर आले की जवळपास 53 टक्के मुले कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लैंगिक शोषणाचे बळी ठरलेले असतात. 20 टक्के बालके गंभीर प्रकारच्या शोषणाचे बळी असतात. अशा प्रकारच्या घटनांना सेक्शुअल असॉल्ट अर्थात लैंगिक हल्ला म्हटले जाते.'
- 'आजही लोकभयास्तव आणि बदनामीच्या भीतीने तरुण व्हिक्टिम्स अशा प्रकारच्या गुन्हेगारांची नावे सांगत नाही. बहुतेक वेळा हे गुन्हेगार कुटुंबातीलच असतात. त्यांना बाहेर काढणे अवघड होऊन जाते. सरकारी आकडेवारीनुसार सेक्शुअल असॉल्ट करणारे 31 टक्के लोक नातेवाईक आणि शेजारी असतात. त्यामुळे आश्चर्य वाटत नाही की 70 टक्के मुले कधीही सांगत नाही की त्यांच्यासोबत कोणी आणि काय केले.'
- 'महिला असल्या कारणाने लज्जा आणि बदनामी हा द्वंद्व आमच्या डोक्यात का येतो ? हे कोडे सोडवणे माझ्यासाठी सर्वात कठीण झाले आहे.'