लोकमतने पुन्हा एकदा घोडचूक केली आहे.व्हॉटस एॅपवर फिरणारी एक बोगस न्यूज त्यांनी दि.४ डिसेबर रोजी प्रकाशित केली होती.विशेष म्हणजे ही बातमी लोकमतच्या सर्व आवृत्तीत पान १ वर प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीचे शिर्षक होते,जिल्हा परिषद शाळांतील विद्याथ्र्यांना उच्च शिक्षण,नोकरीत आरक्षण ....
ही बातमी नांदुर्गा (बुलडाणा) येथील वार्ताहर शैलेश वाकोडे याच्या नावासह प्रकाशित करण्यात आली.एका खेड्यातील वार्ताहर शासन निर्णयाची इतकी मोठी बातमी देतो,तेव्हा मुंबई डेक्सवरील वार्ताहर झोपा काढत होते का ? कसलीही खातरजमा न करता,ही बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
शासनाचा असा कोणत्याही निर्णय नव्हता.परंतु लोकमतच्या बातमीमुळे लोकामध्ये संभ्रम निर्माण झाला होता .या बातमीमुळे लोकमत पुन्हा तोंडावर पडले आहे.
कालच्या बोगस बातमीचा लोकमतनेच आज खुलासा केला आहे.आज दि.५ डिसेंबर रोजी मुंबईहून यदू जोशी यांनी बातमी दिली आहे.राज्यात बोगस जीआरचे पेव...जिल्हा परिषदेच्या संदर्भात कोणताही असा निर्यय झाला नसून,याविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी दिली आहे,असे बातमीत म्हटले आहे.
वारे लोकमत....खोटी बातमीही स्वत:च देणार आणि चूक झाली आहे,हे मान्य करण्याऐवजी असा बोगस जीआर व्हॉटस् एॅपवर फिरवणा-याविरूध्द पोलीसांत तक्रार देणार...अशी बातमी स्वत:च देणार...
चूक झाली असेल तर प्रांजळपणे कबूल करा...त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा..पण गिरे तो भी टांग उपर...
हिमत असेल तर शालेय शिक्षण विभागाने लोकमतच्या विरूध्दच पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी...कारण लोकमतनेच बोगस बातमी दिली आहे...
लोकमतचे मालक आणि लोकमत मीडिया ग्रुपचे चिफ एडिटर राजेंद्र दर्डा अनेक वर्षे शिक्षणमंत्री राहिलेले आहेत.त्यांच्याच लोकमतमध्ये बोगस जीआरवरून जणू काही Exclusive बातमी म्हणून दिली जाते....
हे मात्र नक्की की,लोकमत आता वारंवार तोंडवर पडत असून,जणू काही उतरती कळा लागली आहे,असे वातावरण झाले आहे....