नगर - नंदकुमार सोनार यांच्या
राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नगर सार्वमतच्या संपादकपदी अनंत पाटील यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील हे लोकमत नगर आवृत्तीत निवासी संपादक
होते. ते 1 फेब्रुवारीला रूजू होणार आहेत.
‘लोकमत’सारख्या मोठ्या वृत्तपत्रातून सार्वमतसारख्या स्थानिक वृत्तपत्रात पाटील जात असल्याने नगरमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सारडाशेठने यापूर्वी शिवाजी शिर्के यांच्यासारख्या चांगल्या पत्रकाराला असेच यापूर्वी लोकमतमधून फोडून नगर देशदूतमध्ये कार्यकारी संपादक केले होते. नंतर त्यांचा अचानक राजीनामा घेतला गेला होता. आतादेखील नंदकुमार सोनार चांगल्या संपादकाचा असाच राजकीय दबावापोटी तडकाफडकी राजीनामा घेतला गेला. हा अनुभव नगरमध्ये ताजा असतानाच अनंत पाटील हे चांगली पोझीशन व ग्रुप सोडून सारडाशेठच्या बेभरवशी व्यवस्थापनात दाखल होत आहेत. सार्वमतसह देशदूत ग्रुप सद्या आर्थिक अडचणींशी सामना करत असताना, पाटील यांना घसघशीत पॅकेज देण्यात आले. तथापि, पूर्वानुभव पाहाता, हे पॅकेज किती दिवस त्यांना मिळेल, हेही प्रश्नचिन्हच आहे.
देशदूतची नगर आवृत्ती तोट्यात गेल्यामुळे मागेच बंद पडली आहे. सार्वमत ची आर्थिक पसरीस्तीती सुद्धा ठीक नाही. पूर्वी त्यांचे श्रीरामपुरला मुख्य ऑफिस होते। नगर शहर मध्येही मोठे ऑफिस होते. आता सार्वमत चे हेड ऑफिस व प्रेस नगरला एम आय डी सी मध्ये हलविले आहे । भाडे वाचविण्यासाठी नगर चे ऑफिस बंद करून ते एम आय डी सी मध्ये हलविले आहे।
नगर ची एम आय डी सी शहर पासून 8 किलो मीटर लांब आहे। कार्यक्रम व कामाचे सर्व व्यवहार शहर मध्ये असताना ऑफिस मात्र थेट एम आय डी सी मध्ये असा प्रकार आहे
लोकमत येथे बऱ्यापैकी सेट झालेला आहे। एक नँबर खप आहे. अशा परिस्थिती पाटील यांचा निर्णय धाडसी वाटतो.