आता अधिस्वीकृती समितीने त्यांचा सत्कार करावा
नंदुरबार - राज्य
अधिस्वीकृती समितीचा एक सदस्य नामे चंद्रशेखर गोविंद बेहेरे याला नंदुरबार
जिल्हयाच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश नंदुरबारचे
उपविभागीय दंडाधिकारी सुनील गाडे यांनी आज पारित केल्याने अधिस्वीकृती
समितीच संशयाच्या भोवर्यात सापडली आहे.
राज्य
अधिस्वीकृती समिती गठित होण्यापुर्वीच बेहेरे याच्यावर आठ-नऊ गंभीर
स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे वास्तव समोर आले होतो.राज्याच्या "माज" (
माहिती-जनसंपर्क) विभागाने नंदुरबार पोलिसांकडून बेहेरेवरील गुन्हयांची यादी
ही मागविली होती.ती आल्यानंतरही 14 ऑगस्टला जेव्हा समिती अस्तित्वात आली
तेव्हा त्याला समितीवर घेतले गेले.त्यानंतर बेहेरे यांच्यामुळे
नंदुरबारमधील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याने
त्यांला जिल्हयाच्या हद्ीतून तडीपार करावे अशी विनंती नंदुरबार पोलिसांनी
उपविभागीय दंडाधिकार्यांकडे केली होती.त्यावरही पाच-सहा तारखांना सुनावणी
झाली.याची माहिती मराठी पत्रकार परिषदेला मिळाल्यानंतर परिषदेने
महासंचालकांना वेळोवेळी पत्रं देऊन तसेच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बेहेरे
यांची समितीतून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती.मात्र माजच्या काही
अधिकार्यांनी आणि सीएमओमधील काही वतनदारांनी सातत्यानं तडीपार गुंडाची
पाठराखण केली होती मराठी पत्रकार परिषदेने अधिस्वीकृती समितीच्या पुणे
येथील बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता आणि नागपूरच्या बैठकीवरही
बहिष्कार टाकला होता.मात्र तरीही हट्टानं 'माज' विभाग बेहेरेला पाठिशी घालत
होता.आता बेहेरेच्या तडीपारीचा आदेश निघाल्याने माहिती आणि जनसंपर्क
विभागाची गोची तर होणार आहेच त्याच बरोबर या समितीच्या प्रतिष्ठेलाही मोठा
तडा गेला आहे.ज्या पत्रकारावर एक जरी गुन्हा दाखल असेल त्या पत्रकाराला
अधिस्वीकृती दिली जाऊ नये असा नियम आहे.येथे मात्र तडीपार गुंडच
अधिस्वीकृती समितीत आहे.हा विरोधाभास पत्रकारितेचं किती अवमुल्यनं झालंय ते
दाखविणारा होता.या तडीपार गुंडांचे सत्कार करताना अधिकार्याचे फोटोही
उपलव्ध आहेत.आता बेहेरे यांला अधिस्वीकृती समितीवरून तडीपार केले जाते
की,त्याची पाठराखण केली जाते हे पहायचे आहे.
दरम्यान
एका तडीपार गुंडाला समितीत ठेऊन माहिती आणि जनसंपर्कने समितीची
प्रतिष्ठाच धोक्यात आणली आहे.माज विभागाने आता बेहेरे यांचा जंगी
जाहीर सत्कार करावा आणि समितीची उरली सुरली इज्जतही लिलावात काढावी अशी
मागणी होणार आहे.बेहेरे सत्कार समितीच्या अध्यक्षपदी संचालक शिवाजी मानकर
यांची नियुक्ती करावी अशी सूचनाही महासंचालक आणि मुख्यमंत्र्याकडं केली
जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे.