ठाणे शहरातील गडकरी रंगायतन सभागृहात मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण कार्यक्रम अत्यंत भव्य आणि दिव्य झाला.उध्दव ठाकरे यांच्यामुळे सर्व न्यूज चॅनल आणि सर्व वृत्तपत्राच्या पत्रकारांनी कार्यक्रमास हजेरी लावली.या कार्यक्रमाचे लाईव्ह कव्हरेज अनेक चॅनलनी केले.दर्पण तथा मराठी पत्रकार दिनाचा हा मुख्य कार्यक्रम होता.या कार्यक्रमाचे राज्यातील सर्व पत्रकारांनी तोंडभरून कौतुक केले आहे,तर दुसरीकडे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सुमार कदम आणि मठ्ठ देवदत्तची तोंडे पडली आहेत.
मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे.संस्था स्थापन होवून आजमितीस ७७ वर्षे झाली आहेत.परिषदेचे अध्यक्षपद अनेक मान्यवर पत्रकारांनी भूषविले आहे.ही संस्था कोणाच्या बापाची नाही.ही संस्था आज एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या ताब्यात असली तरी भविष्यात कोणाच्याही ताब्यात जावू शकते,परंतु एस.एम.देशमुख यांचे पाय खेचण्याचे काम सुमार कदम आणि मठ्ठ देवदत्तनी सातत्याने सुरू ठेवले आहे.
राजकारणी लोकांमध्ये राहून पत्रकार राजकारणी झाले आहेत.राजकारण असावे पण गजकरण नसावे.सुमार कदम आणि मठ्ठ देवदत्तला गजकरण झाले आहे.त्याच्या खाजेवर मलम देण्यासाठी हा पत्रप्रपंच आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमास शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी येवू नये म्हणून सुमार कदम आणि मठ्ठ देवदत्तनी नुसती ऊठाठेव केल्याचा भांडाफोड बेरक्याने केल्यानंतर महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात या दोघांबद्दल संतापाची लाट उठली आहे.एकीकडे मराठी पत्रकार परिषदेचा कार्यक्रम दणकेबाज होत असताना,मुंबई मराठी पत्रकार संघाचा कार्यक्रमाचा फज्जा आणि पुरता बोजवारा उडाला,त्याला सुमार कदम आणि मठ्ठ देवदत्तची करणी नडली,असेच म्हणावे लागेल.त्यांच्या कार्यक्रमास शब्दांचे कुबेर यांनी देखील पाठ फिरवली.सोलापुरी ओबामा आणि दिशाहीन झालेले नागपुरी संत्री सोडली तर कोणीच मान्यवर आले नव्हते.कार्यक्रमास जेमतेम २५ ते ३० लोक.तेही एक- एक उठून गेले.सोलापुरी ओबामाला पुरस्कार दिला खरा परंतु त्याच दिवशी अपशकून घडले.उदय भविष्यपत्रातून त्यांना पायउतार व्हावे लागले.ते आता केवळ एका शोचे अँकर उरले आहेत.त्यांचा आता सुंता करण्यात आलेला आहे.सोलापुरी ओबामाही सुमार कदम आणि मठ्ठ देवदत्ताच्याच पंगतीतील.तोंडावर गोड बोलायचे,नुसत्या गमज्या मारायच्या,कामाच्या नावाने बोंबाबोंब.बोलबच्चन सोलापुरी ओबामाला केवळ आठ महिन्यातच जावे जागले.त्यामुळे त्यांचे सीझर करावे लागत आहे.
असो,आपण मुळ विषयावर पुन्हा येवू.सुमार कदम आणि मठ्ठ देवदत्तला कोणी अडवले होते, भव्य आणि दिव्य कार्यक्रम घ्यायला ? त्यांनी पण एस.एम.सारखा भव्य आणि दिव्य कार्यक्रम करावा.यांच्यामागे काळे कुत्रे फिरकत नाही म्हणून एस.एम.च्या वाटेवर मांजर होवू नये,एस.एम.यांनी अशी किती तरी मांजरे पाहिली आहेत.आम्ही काही एस.एम.चे कार्यकर्ते नाही किंवा त्यांचे भाट नाही,परंतु चांगल्याला चांगले म्हणणे हे बेरक्याचे काम आहे.पत्रकारांच्या हितासाठी कोण काम करत असेल तर बेरक्याची सारी शक्ती त्याच्या पाठीमागे उभी करणे,हे आमचे काम आहे.पत्रकारांवर होणारे हल्ले असो की पत्रकारांना लागणारी वैद्यकीय मदत असो,एस.एम.यांनी जी तळमळ दाखवली आहे,त्याला साथ देणे आमचे काम आहे.एस.एम.च्या पाठीमागे महाराष्ट्रातील शेकडो पत्रकार उभे का आहेत,याचा सुमार कदम आणि मठ्ठ देवदत्त यांनी आत्मपरिक्षण करावे.नाचता येईना अंगण वाकडे असे करू नये.
सुमार कदम आणि मठ्ठ देवदत्तच्या ताब्यातही मुंबई मराठी पत्रकार संघ आहे.करोडो रूपयाची संपत्ती त्यांच्या ताब्यात आहे.त्यांनी त्याचा योग्य वापर करावा.एस.एम.पेक्षा चांगले कार्यक्रम करावेत,पत्रकारांच्या हिताचा विचार करावा.परंतु ते न करता,कोणाच्या तरी पायात पायघड्या घालू नये.सुमार कदम यांची आता महाराष्ट्रात पत नाही आणि मठ्ठ देवदत्तला आता कोणता पेपर आणि चॅनल विचारत नाही.मुंबईच्या मंत्रालयातही आता कोणी विचारत नाही.माझे घ्या,माझे घ्या,आणि पंचात न्या,अशी त्यांची अवस्था झालेली आहे.आता ज्येष्ठ नव्हे वयोवृध्द पत्रकार म्हणून त्यांची गणना होईल.
दोघांना आमचे एव्हडेच सांगणे आहे की,कोणाची उंची गाठता येत नसेल तर उंटाचा मुका घ्यायला जावू नका नाही तर असेच थोपाड फुटत जाईल.झाली तेवढी फज्जती आता बस्स झाली.भविष्यात चांगले वागा.तुम्ही असे कार्य करा,बेरक्याला तुमची स्तुती करायला शब्द अपुरे पडतील.
सोलापुरी ओबामानेही बेगडी प्रेम न करता,अंतकरणातून लोकावर प्रेम करावे.तरच लोक तुमच्यावर प्रेम करतील.
वरील तिघांचे चुकत आहे म्हणून त्यांचे कान उपटण्याचे काम केले आहे.बाकी काही आमचा स्वार्थ नाही.
तुर्तास आम्ही थांबतो.
पुन्हा असेच भेटू....
तुमचा विरोधक नव्हे मित्रच...
बेरक्या उर्फ नारद....