पत्रकारांच्या राज्य अधिस्वीकृती समितीतही ललित कोल्हेचा "भाऊ"

तडीपारीची कारवाई प्रलंबित असलेल्या व्यक्तीला पाठिशी घालून 
काही अधिकारी देवेंद्र फडणवीसांची कोंडी करीत आहेत...

जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात तडीपारीचा प्रस्ताव असलेला  मनसे नगरसेवक ललित कोल्हे आणि अन्य एका तडीपार गुंडानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केल्यामुळे सध्या राज्यभर वाद उफाळून आला आहे.वाहिन्यांनी या "सत्कार समारंभास" ठळक प्रसिध्दी दिलेली आहे.मात्र महाराष्ट्रात पत्रकारांना सरकार मान्य पत्रकार म्हणून  जी अधिस्वीकृती समिती कार्ड देते त्या राज्यस्तरीय अधिस्वीकृती समितीमध्येही एक   कथित पत्रकार तडीपारीचा प्रस्ताव दाखल झालेले आहेत.अधिस्वीकृती मिळवायची असेल तर त्याचे चारित्र्य निष्कलंक असावे म्हणजे त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा असा नियम आहे.मात्र चंद्रशेखऱ बेहेरे यांच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल असून त्याना धुळे आणि नंदुरबार जिल्हयातून तडीपार करावे अशी शिफारस नंदुरबार  पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेली आहे.ही वस्तुस्थिती माहिती आणि जनसंपर्क विभागातील प्रत्येकाला माहित असली तरी काही अधिकारीच बेहेरे यांना पाठिशी घालत सरकारच्या अडचणीत भर घालत आहेत.या प्रकरणी आता एका पत्रकाराने कोर्टात धाव घेतली असल्याने आज ना उद्या सरकारची अब्रू चव्हाट्यावर येणार आहे.म्हणजे ललित कोल्हे नव्हे तर इतरही काही तडीपार सरकारमधीलच काहींच्या आशीर्वादाने सरकारच्या कमिट्यावर देखील भुजंगासारखे बसले असून त्यांना माहिती आणि जनसंपर्क तसेच सीएमओ मधील काही अधिकारी पाठिशी घालत आहेत.एका तडीपाराने मुख्यमंत्र्यांना हार घातला म्हणून गहजब होत असतानाच सरकारच्या महत्वाच्या अधिस्वीकृती समितीतही तडीपारीचा प्रस्ताव असलेला व्यक्ती आहे.त्याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही.माहिती आणि जनसंपर्कमधील काही अधिकारी अगोदरच्या सरकारचे दलाल असल्याचे आणि त्यांचे अगोदरच्या सरकारातील काहीशी घनिष्ठ संबंध आणि संपर्क असल्याने ते देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठीच असे उपदव्याप करीत असल्याची चर्चा आहे.अन्यथा एका तडीपारीचा प्रस्ताव असलेल्या व्यक्तीला पाठिशी घालण्याचे काही कारण नाही.तडीपारीची कारवाई प्रलंबित असलेल्या त्या महोदयांबद्दलची कागदपत्रेही महासंचालक चंद्रशेखऱ ओक तसेच संचालक शिवाजी मानकर यांच्याकडे उपलब्ध आहेत.तसेच सीएमओकडेही ही कागदपत्रे दिलेली असतानाही एका गंभीर गुन्हे असलेल्याला पाठिशी घातले जात आहे.यामध्ये कोणाचे काय हितसंबंध आहेत ते समोर आले पाहिजे अशी मागणी आता पत्रकार करीत  आहेत.