मी मराठीचा बाजार उठणार !

मी मराठी,मी मराठी लाइव्ह आणि लाइव्ह इंडिया न्यूज चॅनलचा मालक महेश मोतेवार गजाआड झाल्यामुळे आणि आता किमान दोन वर्षे तरी सुटण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे दोन्ही चॅनलमधील आणि पेपरमधील कर्मचारी धास्तावले आहेत.
अनेक कर्मचा-यांनी दुस-या चॅनलमध्ये संधी मिळते का,याची चाचपणी सुरू केली आहे.मोतेवार गजाआड होण्याअगोदर जे गेले,ते सुटले म्हणावे लागेल.
मी मराठी चॅनल २०० कोटी रूपयाला खरेदी केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे आणि तो पैसा चिटफंडचा होता,हे उघड झालेला आहे.त्यामुळे मी मराठीचे जे संचालक होते,ते गोत्यात येण्याची शक्यता आहे.सुमार केतकर,इंडिया राऊत,निखिल बगळे,सुर्योदय आंबेकर या चौकडीने मोतेवारला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु जेव्हा मोतेवार सुटू शकत नाही तेव्हा इंडिया राऊत आणि निखिल बगळ्याप्रमाणे उडून गेले.
मोतेवार म्हणत होते,आंबे असलेल्या झाडाला लोक दगड मारतात,म्हणून त्यांनी जवळ आंबेकर बाळगले परंतु कायद्यापुढे त्यांची उंची ठेंगणी पडली...
मी मराठी आणि लाईव्ह इंडियाच्या कर्मचा-यांचा पगार चिटफंड कंपनीतून होत होता.आता मोतेवार गजाआड झाल्यामुळे हा पैसा येणे बंद होईल.त्यामुळे मी मराठी,मी मराठी लाइव्ह आणि लाइव्ह इंडियाचा बाजार उठण्याची शक्यता आहे.
आम्ही जॉब नाही,पत्रकारिता करतो म्हणणारे मूग गिळून गप्प आहे.अन्याय कशाला सहन करता म्हणणारे गुंतवणूकदारांच्या बाजूने उभे राहणार का ?
नुसती पोपटपंची आणि बोलबच्चनपणा करणे सोपे आहे.प्रत्यक्षात निभावणे अवघड आहे...
आता यापुढे सरळ कबूल करा आणि जाहिररित्या म्हणा...आम्ही पत्रकारिता नव्हे जॉब करतो...पैसा कमावणे आमचे काम आहे...
लोकांवर होणारा अन्याय दूर करून शकत नाही,माफी असावी...
तरच लोक तुम्हाला माफ करतील अन्यथा मोतेवार म्हटल्याप्रमाणे लोक आंब्याच्या झाडाला नव्हे लोकांना दगड घालतील...