एकीकडे मी मराठीचा बाजार उठला असताना दुसरीकडे शेट्टींनी मात्र चॅनेलचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचाच पहिला भाग म्हणून जुन्या कर्मचाऱ्यांचा पगार 20 ते 50 टक्क्यांनी वाढवण्यात आलाय, त्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यात शेट्टींना यश आलं आहे. शिवाय नवे ज्वॉइनिंगचे सत्र अजूनही सुरु असून मयांक भागवत यांच्या नंतर श्रीरंग खरे जय महाराष्ट्रत एंट्री करणार आहेत. त्यातच आणखी काही कामाचे मोहरेही जय महाराष्ट्रच्या हाती लागल्याचे समजतंय. असं असताना दुसरीकडे डिस्ट्रिब्यूशनवरही विशेष लक्ष ठेऊन वाढवण्यासाठी शेट्टी आणि त्रिकुटाच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. त्यामुळे जय महाराष्ट्रवर चांगले दिवस येण्याची शक्यता आहे