"लोकमत"चे पुन्हा "भाजपमत"


 "महाराष्ट्र टाईम्स", गौतमराव संचेती आणि "टीम मटा"चं अभिनंदन


काल शहरात सर्वाधिक चर्चेचा  विषय ठरलेली "सुरक्षारक्षक गडकरी-फडणवीस" यांच्या बातमीबाबत आज "मटा "ने बाजी मारली आहे. "योग्य बातमी कशी लिहावी", याचे उत्तम उदहरण "महाराष्ट्र टाईम्स"ने पेश केले आहे. याबाबत जळगाव ब्युरो चीफ गौतमराव संचेती आणि "टीम मटा"चं खास अभिनंदन!! नाशिकमधील वृत्तसंपादक अमित महाबळ, महेश पठाडे आणि संपादक शैलेंद्र तनपुरे यांचेही अभिनंदन….
"फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टमुळे दिवसभर चर्चेचे गुऱ्हाळ" अशा शीर्षकाची बातमी देताना "मटा"ने थेट जसे घडले तसे दिले आहे. मुळात ही वादग्रस्त पोस्ट अशोक लाडवंजारी यांच्याच फेसबुक अकौंटवरून अपलोड झालीय, हे फक्त आणि फक्त "मटा"ने स्पष्टपणे नमूद केलेय. बाकी नंतर प्रकरण अंगाशी आल्यावर हे बनावट, डुप्लिकेट तक्रार वैगेरे सोपस्कार ओघाने आलेच … त्यासाठी दुपारी २ ते रात्री ११ म्हणजे तब्बल ९ तास लागले की लक्षात यायला ….
'महाराष्ट्र टाईम्स'ची बातमी म्हणते, "सध्या फेसुबकवरून पालकमंत्री एकनाथ खडसे यांना धमकी दिल्यावरून दोन तरुणांवर गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असताना अशा प्रकारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांची खिल्ली उडवत असल्याने हा मुद्दा दिवसभर चर्चेत राहिला होता. अनेकांच्या टीकेचेही लक्ष्य झाल्याने लाडवंजारी यांनी अखेर ही पोस्ट फेसबुक पेजवरून डीलीट केली." … ही हिंमत फक्त "मटा"ने दाखविली ….
बाकी अडचणीत आलेला माणूस तक्रारी, खुलासे करणारच ….   "माझे अकौंट ब्लॉक करून कुणी तरी फेक अकौंट तयार करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे." हा लाडवंजारी यांचा खुलासा 'मटा'ने छापलाय …. हा खुलासाही हास्यास्पद आहे. "कुणी तरी फेक अकौंट" तयार केलेलेच नाही; त्यांच्याच अकौंटवरून सारा प्रकार झालाय.
'मटा'ने खुलाशाला फार महत्त्व दिलेले नाही; मूळ घटना योग्यरितीने अधिक फोकस केलीय. आणि हीच पत्रकारिता असते. पत्रकारितेच्या शाळांमध्ये हेच शिकविले जाते. आता "लोकमत"ने पुन्हा काय केले पाहा …. पत्रकारितेचा मूलभूत सिद्धांत विसरून त्यांनी "लाडवंजारींच्या नावाने बनावट अकौंट; भाजपा नेत्यांची बदनामी" अशी PRO  देतात तशी बातमी दिली आहे. मूळ घटनेऐवजी त्यांनी खुलासाच छापलाय. जे काम "तरुण भारत"ने करायचे ते भाजपाचे मुखपत्र झाल्यागत "लोकमत"ने केलेय…
यावरून एक नक्की स्पष्ट होतेय की काही नेते म्हणतात तसं पत्रकारितेची शिकवण विसरून पाठविल्या जाणाऱ्या "पाकिटा"नुसार (बातम्यांच्या!) त्या प्रसिद्ध केल्या जातात. "लोकमत"ला पाकीट पोहोचले असणार (अर्थातच बातमीचे, खुलाशाचे) …. त्यामुळे मूळ बातमी सोडून "लोकमत"वाले "पाकीटा"ला जागले; म्हणजे "पाकीटा"तून  आलेल्या बातमी/खुलाशावर विश्वास ठेवून, स्वत: कष्ट न करता; "जे मिळालेय हाती" तेच "छापून मोकळे झाले". हा वाचकांच्या सत्य जाणून घेण्याच्या, मूळ घटना जाणून घेण्याचा अधिकारावर घातलेला घाला आहे… आता संचेती स्वत: कष्ट घेतात, 'मटा'वाले पाकिटे (बातम्यांची, आयती मिळणारी!!) घेत नाहीत …. त्यामुळे त्यांनी हे "पाकिट" घेतले नसावे आणि मूळ घटना प्रसिद्ध करून वाचकांप्रती आपली प्रतिबद्धता सिद्ध केली.
ही 'मटा'ची बातमी (टेक्स्ट लिंक) :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/ashok-ladwanjari-facebook-post-issue/articleshow/51096792.cms
ही 'मटा'ची बातमी (इमेज लिंक) :
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31831&articlexml=23022016001033
ही 'लोकमत'ची बातमी (इमेज लिंक) :
http://epaper.lokmat.com/newsview.aspx?eddate=02/23/2016&pageno=4&edition=46&prntid=17895&bxid=27474294&pgno=4