महाराष्ट्रनामा

नारायण राणे यांच्या 'प्रहार'मध्ये सध्या असंतोष खदखदत आहे.एकूण दहा जणांनी राजीनामा दिलाय.
वेळेवर पगार न होणे आणि संपादक भावे यांच्या भावखाऊ वृत्तीमुळे राजीनामा सत्र सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
नारायण ! नारायण !!


.........

 औरंगाबादची गावकरी आवृत्ती बंद पडली होती, ती आता आदर्श महिला बैंकचे संचालक अंबादास मानकापे यांनी चालवण्यास घेतली असून संपादक म्हणून  अनिल फळे  ज्वाइन झाले आहेत....

................

मुंबई - मंगेश चिवटे यांचा सामला राम राम
लवकरच  डेप्युटी न्यूज एडिटर म्हणून  IBN  लोकमत ज्वाइन करणार ....


.....................


उदगीर येथील पत्रकार विनायक चाकूरकर यांना माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी तंगडे तोडण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी आज उपजिल्हाधिकार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तर सुरू केले आहेच त्याच बरोबर 'या आणि माझे हातपाय तोडा नाही तर राजकारण सोडा' असे आव्हानही दिले आहे.सरकार कायदा करीत नाही म्हटल्यावर पत्रकार आता आव्हानाची भाषा करायला लागले आहेत.ही वेळ सरकारने पत्रकारांवर आणली आहे.आम्ही विनायक चाकूरकर यांच्या समवेत आहोत.त्यांना दिल्या गेलेल्या धमकीचा निषेध .................

पनवेल - दैनिक कर्नाळाच्या संपादकपदी उन्मेश गुजराती