नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अलीकडेच ज्येष्ठ
पत्रकार विजय कृष्णराव पवार यांना समाजशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान
केली.
"वैदर्भीयांच्या सामाजिक विकासात प्रसारमाध्यमांची भूमिका" या त्यांच्या संशोधनाला रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या निरंतर, प्रौढ शिक्षण आणि विस्तार विभागाच्या संचालक डॉ. जयमाला डूमरे (dumre) यांचे मार्गदर्शन लाभले. नागपूर लगतच्या फेटरी येथील मूळ निवासी पवार गत 22 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अर्थशास्त्र, लोकप्रशासन, मराठी, समाजशास्त्र (चौथा मेरीट), राज्यशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान (दुसरा मेरीट), आंबेडकर विचारधारा आणि भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र या नऊ विषयांत एम .ए . तसेच इतिहासात एम. फिल. सह 14 पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. त्यांचे "स्वातंत्र्य चळवळीत नागपूरच्या वृत्तपत्रांची भूमिका " हे इतिहासावरील संशोधन संदर्भ ग्रंथ ठरले. या यशाचे श्रेय ते आपले मार्गदर्शक, गुरुजन, मित्रमंडळी आणि पत्नी अर्चना यांना देतात. कामगार चळवळीत सक्रीय विजय पवार यांनी नागपूर पत्रिका, सामना, देशोनत्ती, नवराष्ट्र आदि वृत्तपत्रांमध्ये काम केलेले आहे.