पद्मश्री यांच्या पेपरची मुंबईत यंदा मोठी घसरण झाली. एबीसीने जाहिर
केलेल्या खपाच्या आकड़यानुसार पद्मश्री यांचा पेपर थेट 6 ते 7 क्रमांकावर
फेकला गेला आहे. त्यानंतर खड़बडून जागे झालेल्या पद्मश्रीनी मुंबईत तातडीने
बैठक घेवून मुंबई टीमचा आढावा घेतला. मात्र या बैठकीत पेपर कसा वाढेल यावर
चर्चा होण्यापेक्षा मुंबई टीम मध्ये जास्त वरचढ़ कोण याचीच स्पर्धा जास्त
दिसून आली. रंगीला औरंगाबादीच्या मानसिक विकृतीमुळे कोणीही चांगला रिपोर्टर
अथवा संपादकीय कर्मचारी येथे टिकत नाही. त्यातच पद्मश्रीचे जुने "तान"
मारून आणि "फाटक" लावून बसलेले शिलेदार व रंगीला औरंगाबादी यांच्यातून
सध्या विस्तव देखील जात नाही. हे विस्तव का जात नाही याला कारण देखील तसेच
मजेदार आहे. आधीच औरंगाबादी याच्या 'रंगीला'पणाने बदनामीचा कळस गाठलेल्या
या पेपर मध्ये सध्या नवीन 'रंगीला मुलुंडबादी"च्या एका लेडी फोटोग्राफर
सोबत असलेल्या संबंधाची जोरदार चर्चा रंगत असून त्यावरूनच "औरंगाबादी" आणि
"मुलुंडबादी" यांच्यात जोरदार जुम्पली आहे. या दोघांचा वाद थेट पद्मश्री
यांच्यासमोरच रंगल्याने पेपर वाढवणे तर राहिले दुरच मात्र अंतर्गत
कलहामुळेच पद्मश्री यांची बैठक जास्त चर्चेत राहिली. रंगीला औरंगाबादीची
मानसिक विकृती आणि रंगीला मुलुंडबादी याची "तानफाटक" तानाशाही यामुळे इतर
नवखे रिपोर्टर मात्र विनाकरण भरडले जात आहेत. त्यामुळे तब्बल तीन तीन वेळा
जाहिराती देवून देखील कोणीही पद्मश्री यांच्या पेपर मध्ये नोकरिसाठी यायला
तयार नाही. ठाण्यात तर या पेपरची स्थिती अजुन बिकट असून गेल्या
वर्षभरापासून एक दोनच माणसे काम करीत आहेत. तर येथे लोकल पेपरचे आणि नवखे
रिपोर्टर देखील जॉबसाठी यायला तयार नाहीत. मुंबई आणि ठाण्यासाठी जम्बो
भर्तीची जाहिरात देवून देखील शून्य प्रतिसाद असल्याने करावे तरी काय असा
पेच पद्मश्री समोर निर्माण झाला आहे. पद्मश्रीच्या पेपर मधील विकृत लोकांची
मक्तेदारीचे किस्से सर्वत्र प्रसिद्ध असल्याने 'जॉब नसेल तर चालेल पण येथे
काम नको' अशी लोकांमध्ये प्रतिक्रया आहे.