बीडच्या दत्ताभाऊंचा आता ‘बालाजी’च्या दारात नवा संसार!
बीड (विशेष प्रतिनिधी): पत्रकारितेत काहींची लेखणी चालते, तर काहींचा केवळ हात चालतो. पण बीडमध्ये ‘सकाळ’चे वरिष्ठ वार्ताहर राहिलेल्या दत्तात्रय देशमुखांनी असा काही हात चालवला की अख्ख्या मीडिया जगताचे डोळे विस्फारले! ‘सकाळ’मध्ये आजवर अनेकांनी गफले केले, हात धुवून घेतले आणि नंतर त्यांची गचांडी पकडून हकालपट्टी झाली खरी; पण दत्ताभाऊंचा मामला थेट ‘इतिहास घडवणारा’ ठरला आहे.
देशमुखांनी बीडमध्ये पत्रकारितेचा असा काही उद्योग मांडला की संस्थेच्या नावावर परस्पर खाती उघडणे, त्यावर देणग्या आणि निधी गोळा करणे, जाहिरातींची बिले परस्पर आपल्याच खात्यात वळवून मलिदा लाटणे... एकामागून एक कारनामे बाहेर येत गेले. जेव्हा व्यवस्थापनाच्या डोक्यात ही भानगड आली, तेव्हा ‘सकाळ’ने केवळ देशमुखांची हकालपट्टीच केली नाही, तर वृत्तपत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वतःच्याच पानावर भलामोठा फोटो लावून देशमुखांचे ‘काळे कारनामे’ चव्हाट्यावर आणणारे जाहीर प्रगटन ठोकले!
"यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नका, केल्यास संस्था जबाबदार राहणार नाही," अशी थेट दवंडीच वृत्तपत्राच्या पानावर पिटाळली गेली. स्वतःच्याच ज्येष्ठ बातमीदाराची अशी उघड्यावर बदनामी होण्याची ‘सकाळ’च्या इतिहासातील ही पहिलीच नामुष्की ठरली.
पण पठ्ठ्या मागे हटेल तो दत्ताभाऊ कसला! इकडे ‘सकाळ’ने पाटी कोरी करून दाराबाहेर काढले, तिकडे भाऊंनी नवीन आश्रय शोधून काढला आहे. आता थेट माजलगावच्या बालाजीच्या आशीर्वादाने भाऊंची गाडी नव्या प्लॅटफॉर्मवर लागली असून नवा ‘कार्यारंभ’ सुरू झाल्याची जोरदार चर्चा बीडच्या मीडिया वर्तुळात रंगली आहे.
‘सकाळ’चे पानी उतरल्यावर आता नव्या आखाड्यात भाऊंची ही करामत किती दिवस चालते आणि तिथे कोणती नवीन खाती उघडली जातात, याकडेच आता संपूर्ण बीडच्या बेरक्यांचे लक्ष लागले आहे!
दरम्यान, तिकडे सकाळचा घसरलेला डोलारा सांभाळण्यासाठी नितीन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या